सिडनी: जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. भारतात आलेल्या दुसऱ्या लाटेचा फटका IPLला देखील बसला. आयपीएलचे उर्वरित 31 सामने स्थगित करावे लागले. त्यामुळे खेळाडू आपल्या घरी परतले. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना थेट भारतातून त्यांच्या घरी जाण्याची बंदी असल्याने व्हाया मालदीव ते घरी पोहोचले. मालदीव आणि सिडनीमध्ये क्वारंटाइन दरम्यानचा अनुभव ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू पॅट कॉमिन्सननं आपल्या युट्यूब चॅनलवर सांगितला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाचे बॉलर्स आणि ऑलराऊंडर्स हाताची ताकद टिकवून ठेवण्यासाठी क्वारंटाइन आणि लॉकडाऊन दरम्यान टॉवेलचा उपयोग करून बॉलिंगचा सराव करत आहेत. कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजला जाण्यापूर्वी महिनाभर क्रिकेट नसल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ या टप्प्यात तंदुरुस्त राहण्यासाठी टॉवेल्स वापरण्यासह नवीन मार्ग शोधत आहे.



कोरोनामुळे 4 मे रोजी IPL 2021 तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना मालदीव मार्गे मालदीव मार्गे भारतातून आपल्या घरी जावं लागलं. याचं कारण भारतातून ऑस्ट्रेलियात जाण्यासाठी बंदी होती. तर सिडनीमध्ये पोहोचल्यानंतरही त्यांना 14 दिवस क्वारंटाइन राहाणं बंधनकारक होतं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना आपल्या घरी जाण्याची परवानगी मिळाली.


पॅट कॉमिन्सनने ट्रेनरने सांगितलेली गोष्ट उपयोगात आणली. रूममध्ये बॉलने सराव करणं शक्य नाही त्यामुळे टॉवेलचा उपयोग करून खेळाडूंनी आपला सराव सुरू ठेवला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी खेळाडूंचा क्वारंटाइन दरम्यान देखील सराव सुरू होता.