India vs Australia 3rd Test: सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border–Gavaskar Trophy) सुरु आहे. या सिरीजमध्ये टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली असून तिसरा सामना 1 मार्चपासून खेळवला जाणार आहे. दरम्यान दुसरी टेस्ट मॅच संपल्यानंतर ऑस्ट्रेलिया टीमचा (Australia Team) कर्णधार पॅट कमिंस (Pat Cummins) मायदेशी परतला. मात्र त्यानंतर आता प्रश्न असा आहे की, कमिंस ऑस्ट्रेलियामध्ये परतल्याने कर्णधारपदाची धुरा कोणाकडे जाणार? 


कमिंसच्या अनुपस्थितीत कोणाला मिळणार कर्णधारपद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॅट कमिंसच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) इंदूरमध्ये होणाऱ्या तिसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये टीमची कमान सांभाळणार आहे. दुसऱ्या सामन्याच्या पराभवानंतर कमिंस मायदेशी परतल्याने स्मिथच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पॅट कमिंसच्या आईची तब्येत ठीक नसल्याने त्याला ऑस्ट्रेलियाला जावं लागलं.


काय म्हणाला कमिंस?


दिल्लीमध्ये झालेली दुसरी टेस्ट अवघ्या 3 दिवसांमध्ये संपली आणि त्यानंतर कमिंस ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. दरम्यान तिसऱ्या टेस्टसाठी बराच कालावधी असल्याने कमिंस पुन्हा येणार असल्याची आशा होती. मात्र तिसऱ्या टेस्टसाठी तो अनुपस्थितीत असणार आहे. त्यामुळे आता चौथ्या टेस्टसाठी कमिंस भारतात येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 


कमिंसच्या सांगण्यानुसार, "मी भारतात न परतण्याचा निर्णय घेतला आहे. मला वाटतं की, मी माझ्या कुटुंबासोबत राहिलं आहे. मी ऑस्ट्रेलिया क्रिकेट आणि साथिदारांकडून मिळालेल्या समर्थनाचे मी आभार मानतो. "


दरम्यान दुसरी टेस्ट संपल्यानंतर स्टिव्ह स्मिथ त्याच्या पत्नीसोबत दुबईमध्ये गेला आहे. कमिंस टेस्टमधून बाहेर पडल्याची माहिती त्याला तिथेच मिळाली. स्मिथने 2021 मध्ये उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर दोन टेस्ट सामन्यांमध्ये टीमचं नेतृत्व केलंय.


ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 2023 


• तिसरी टेस्ट- 1 ते 5 मार्च (इंदूर)
• चौथी टेस्ट- 9 ते 13 मार्च (अहमदाबाद)
• पहिली वनडे- 17 मार्च (मुंबई)
• दुसरी वनडे- 19 मार्च (विशाखापट्टणम)
• तिसरी वनडे- 22 मार्च (चेन्नई)