मुंबई : दीपक हुड्डा आणि कृणाल पांड्याची दुश्मनी सगळ्यांनाच माहिती आहे. या दुश्मनीचं मैत्रीमध्ये रुपांतर आयपीएलमध्ये होत असताना आता ज्याची भीती होती तेच घडलं. पुन्हा एकदा कृणाल पांड्याची दीपक हुड्डामुळे सटकली आणि वाद निर्माण झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत दीपक आणि कृणाल 8 सामन्यांमध्ये सगळं नीट सुरू असताना 9 व्या पंजाब विरुद्धच्या सामन्यात गडबड झाली. दीपक हुड्डा आणि कृणाल पांड्या क्रीझवर होते. त्यावेळी रनआऊट झाल्याने कृणाल पांड्या पुन्हा दीपक हुड्डावर संतापल्याचं पाहायला मिळालं. 


यामुळे संतापला कृणाल पांड्या
लखनऊने पंजाब किंग्जचा 20 धावांनी पराभव केला. या सामन्यात दोन्ही संघाच्या फलंदाजांना विशेष कामगिरी करता आली नाही. या सामन्यात दीपक हुड्डा बाद झाल्याने कृणाल पांड्याला राग आला. 


दीपक आणि कृणाल लखनऊकडून मैदानात उतरले. तेव्हा दीपक 14 व्या ओव्हरमध्ये रनआऊट झाला. कृणालला ही गोष्ट अजिबात आवडली नाही. रनआऊट होणं ही दीपकची चूक असल्याचं कृणालला वाटत होतं. 


कृणाल आणि दीपक हुड्डा दोन धावा घेण्याच्या तयारीत होते. मात्र दीपक धावा काढताना स्मार्टपणा दाखवत नसल्याचं लक्षात आलं. त्यामुळे तो रनआऊट झाला. यावरून कृणाल पांड्या त्याच्यावर संतापला.