पुणे : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 45 वा सामना हा पंजाब किंग्स (Punjab Kings) विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. पंजाबने टॉस जिंकला आहे. कॅप्टन मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) लखनऊला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. (pbks vs lsg ipl 2022 punjab kings win toss and elect bowl against lucknow super giants at pune)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईला पराभूत करणाऱ्या लखनऊने टीममध्ये एकमेव बदल केला आहे. वेगवान गोलंदाज आवेश खान दुखापतीतून परतला आहे. त्यामुळे मनीष पांडेच्या जागी आवेश खानला संधी दिली आहे. तर पंजाबने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.


लखनऊ पॉइंट्सटेबलमध्ये 10 पॉइंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. तर पंजाब 8 गुणांसह 7 व्या स्थानी आहे. लखनऊचा कॅप्टन केएल आणि पंजाबचा कर्णधार मयंक हे दोघे जीवलग मित्र आहेत. 


मात्र हे सख्खे मित्र या सामन्यात आमनेसामने आहेत. त्यामुळे या सामन्यात कोण जिंकणार, याकडे क्रिकेट चाहत्यांतं लक्ष लागून राहिलंय. 


पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन : मयंक अग्रवाल (कॅप्टन), शिखर धवन, भानुका राजपाक्षा, जॉनी बेयरस्टो, लियम लिविंगस्टन, जितेश शर्मा (विकेटकीपर), ऋषी धवन, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंह आणि संदीप शर्मा.


लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डीकॉक (विकेटकीपर), मार्कस स्टोयनिस, दीपक हुड्डा, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, जेसन होल्डर, दुश्मंता चमीरा, आवेश खान, मोहसिन खान आणि रवी बिश्नोई.