लंडन : बँकांचं ९ हजार कोटींचं कर्ज घेऊन फरार किंगफिशरचा मालक विजय माल्या लंडनमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेची मॅच बघायला आला होता. विजय माल्ल्या दिसताच प्रेक्षकांनी चोर-चोरच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टेडियमच्या गेटवरून माल्ल्या आतमध्ये जाताना हा प्रकार घडला. प्रेक्षकांच्या घोषणांच्यावेळी माल्ल्या शांत राहिला आणि स्टेडियमच्या आतमध्ये गेला. याआधी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये झालेल्या भारताच्या दोन्ही मॅचना विजय माल्ल्यानं हजेरी लावली होती. विराट कोहलीच्या चॅरीटी कार्यक्रमातही माल्लायनं हजेरी लावली होती. माल्ल्याला पाहताच भारताच्या खेळाडूंनी तिकडून पळ काढला होता.


माल्ल्या येताच 'चोर-चोर'च्या घोषणा