Virat Kohli: लोकांनी आमच्याकडून अपेक्षा ठेवू नये...; वर्ल्डकपपूर्वीच असं का म्हणतोय विराट कोहली?
Virat Kohli: वेस्ट इंडिज आणि अमेरिका या ठिकाणी होणारा आगामी T-20 वर्ल्डकप टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. यावेळी सर्व चाहत्यांना टीम इंडियाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अनेकांच्या म्हणण्याप्रमाणे विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवटचा T20 वर्ल्डकप असू शकतो.
Virat Kohli: अवघ्या 2 दिवसांनी आयसीसी टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. टी-20 वर्ल्डकपच्या मिशनची भारताची सुरुवात 5 जूनपासून होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना आयरलँडसोबत होणार आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये मिळालेल्या पराभवानंतर चाहत्यांची यंदाच्या टी-20 वर्ल्डकप जिंकण्याच्या आशा फार वाढल्या आहेत. दरम्यान वर्ल्डकपपूर्वी चाहत्यांच्या अपेक्षांबाबत विराट कोहलीने मोठं विधान केलं आहे. नेमकं कोहली काय म्हणाला आहे ते पाहूयात.
वेस्ट इंडिज आणि अमेरिका या ठिकाणी होणारा आगामी T-20 वर्ल्डकप टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. यावेळी सर्व चाहत्यांना टीम इंडियाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अनेकांच्या म्हणण्याप्रमाणे विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवटचा T20 वर्ल्डकप असू शकतो. यावेळी विराट कोहलीच्या म्हणण्याप्रमाणे, टीम इंडिया जिथे कुठे खेळते तेव्हा टीमकडून नेहमीच विजयाची अपेक्षा असते.
भारतात क्रिकेटला बघण्याचा दृष्टिकोन वेगळा
स्टार स्पोर्ट्सने टी-20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाच्या खेळाडूंचे खास इंटरव्ह्यू घेतले आहेत. यावेळी विराट कोहली म्हणालाय की, भारत जिथे जिथे खेळेल त्या ठिकाणी अपेक्षा नेहमीच असतात. लोकांनी आमच्याकडून अपेक्षा ठेवू नयेत असं मी म्हणणार नाही. भारतात क्रिकेटकडे पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. आणि ही आमची एक जमेची बाजू म्हणावी लागले.
कोहली पुढे म्हणाला की, जर आपण याकडे जास्त लक्ष दिलं तर ते देखील आपली ती एक मोठी कमजोरी बनू शकते. मला वाटतं की, आम्ही याला आमची एक ताकद म्हणून पाहिले पाहिजे. आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आमच्या मागे बरेच चाहते आहेत.
विराट कोहली अमेरिकेला रवाना
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आज टीममध्ये दाखल होणार आहे. मात्र, तो बांगलादेशविरुद्धचा सराव सामना खेळणार की नाही, याबाबत शंका व्यक्त करण्यात येतेय. T-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचे 10 सदस्य रविवारी सकाळी न्यूयॉर्कला पोहोचले. रोहितशिवाय जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांचाही यामध्ये समावेश होता.
टी-20 वर्ल्डकपसाठी कसा आहे टीम इंडियाचा स्क्वॉड?
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप-कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जड़ेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज