आजच्याच दिवशी ३ वर्षांपूर्वी क्रिकेट मैदानात घडली होती दु:खदायक घटना
क्रिकेट जगतात बॉलमुळे अनेक अपघात झाले आहेत. बॉलमुळे अनेक क्रिकेटर्सला आपले प्राणही गमवावे लागले आहेत. अशाच एका उमद्या बॅट्समनची कारकीर्द एका बाउन्सरवर अकाली संपुष्टात आली.
नवी दिल्ली : क्रिकेट जगतात बॉलमुळे अनेक अपघात झाले आहेत. बॉलमुळे अनेक क्रिकेटर्सला आपले प्राणही गमवावे लागले आहेत. अशाच एका उमद्या बॅट्समनची कारकीर्द एका बाउन्सरवर अकाली संपुष्टात आली.
...आणि फिलिप शुद्धीवर आलाच नाही
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिलीप ह्यूज हा बॅटिंगसाठी मैदानात उतरला. मात्र, त्याच दरम्यान ह्यूजच्या डोक्याच्या खाली मानेवर बॉल धडकला. या आघातानंतर बेशुद्ध झालेला फिलिप शुद्धीवर आलाच नाही.
सिडनीमध्ये घडला अपघात
फिलिप ह्यूज याचा आजच्याच दिवशी म्हणजेच २७ नोव्हेंबर (२०१४) साली खेळताना बॉल लागल्याने मृत्यू झाला. सिडनीमध्ये दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि न्यू साऊथ वेल्स यांच्यात सुरु असलेल्या मॅचमध्ये हा अपघात घडला. मॅच सुरु असताना फास्ट बॉलर शॉन अॅबॉटने टाकलेला बॉल थेट ह्यूजच्या डोक्याला लागला आणि तो खाली कोसळला.
मैदानातून 'कोमात'
फिलिप ह्यूज याला स्थानिक मॅच खेळत असाताना बाऊंसर लागला. त्यानंतर त्याला उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, जखम इतकी गंभीर होती की फिलिप ह्यूज कोमात गेला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे २७ नोव्हेंबरला त्याचं निधन झालं.
ह्यूजला श्रद्धांजली
या अपघाताने संपूर्ण क्रिकेटविश्वालाच जबरदस्त धक्का बसला. त्यानंतर प्रत्येकानेच आपल्या पद्धतीने ह्यूजला श्रद्धांजली वाहिली.
ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टिवन स्मिथ आजही फिलिप ह्यूजमुळे मोठं नुकसान झाल्याचं मानतो. इतकचं नाही तर स्मिथने याबाबत सोशल मीडियात आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. आज ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिलिप ह्यूज याच्या मृत्युला तीन वर्ष पूर्ण झाली. स्मिथने इंस्टाग्रामवर लिहीलं की, "३ वर्ष निघून गेली मात्र, आजही मी तुला मिस करतो #408."
आजच दिवशी ऑस्ट्रेलियाने ५ मॅचेसच्या अॅशेस सीरिजची पहिली मॅच जिंकली आणि आजच ह्यूजच्या मृत्यूला तीन वर्ष पूर्ण होत आहेत.