PICS : शिखरने शायराना अंदाजात दिल्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
टीम इंडियाचा सलामी फलंदाज शिखर धवन सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबूकवर आपल्या फॅन्ससाठी अनेक गोष्टी शेअर करताना दिसत आहे.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा सलामी फलंदाज शिखर धवन सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबूकवर आपल्या फॅन्ससाठी अनेक गोष्टी शेअर करताना दिसत आहे.
नुकताच त्याने राष्ट्रगीत म्हणणाऱ्या आपल्या मुलाचा व्हिडिओ शेअर केला होता. तर सोमवारी त्याने आपली पत्नी आणि स्वतःचा एक सुंदर फोटो पोस्ट केला. ३० ऑक्टोबर म्हणजे शिखर आणि त्याची पत्नी आयशाच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्याने यासाठी आपला फोटो पोस्ट केला आहे.
हा फोटो पोस्ट करताना आपल्या भावना शायरीत मांडल्या आहेत. तो म्हटला... हुए पूरे 5 साल हमारी शादी को, लगता है ऐसे कि तुमसे पहले नहीं कोई जिंदगी थी मेरी....
शिखरच्या या भावनात्मक मेसेजला त्याचा चाहत्यांनी खूप पसंत केला. तसेच इन्स्टाग्रामवरही त्याने एक फोटो पोस्ट केला आहे.
धवनच्या या पोस्टवर त्याच्या बायकोनेही या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. त्यावेळी तिने त्यांच्या लग्नाचा दिवसाची आठवण करून दिली. ती म्हणाली, आम्ही सच्चे दोस्त आहोत आम्ही एकमेकांना भेटलो यासाठी मी ईश्वराचे धन्यवाद करते.