नवी दिल्ली : जगातील सर्वाश्रेष्ठ धावपटू ज्याने आपल्या वेगाने मानवी शरीराच्या क्षमतांचे पॅरामीटर्स मोडून सर्वांना चकीत केले होते. ज्याला पॄथ्वीवरील सर्वात वेगवान धावणारा मनुष्य ओळखलं जातं. तो म्हणजे उसेन बोल्ट.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकदा उसेन बोल्टची तुलना चित्त्यासोबत करण्यात आली होती. पण याच उसेनला रनिंगच्या ट्रॅकऎवजी क्रिकेटच्या मैदानात बॅट हातात घेऊन बघितल्यावर काय म्हणाल?


उसेन बोल्ट सध्या क्रिकेटच्या मैदानात त्याच्या सर्वात आवडत्या गोष्टीत वेळ घालवत आहे. तो नुकताच क्रिकेट खेळताना बघायला मिळाला. उसेन सध्या ऑस्ट्रेलियामध्ये असून तो ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीममध्ये सामिल झालाय. बसला ना धक्का..?



येत्या २३ नोव्हेंबरपासून एशेज सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियन टीम यावेली सीरिज जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. त्यासाठी ते कठोर मेहनत करताना दिसत आहे. यासाठीच त्यांनी जगातल्या सर्वात वेगवान धावपटूला टीमसोबत जोडलं आहे. 



उसेन बोल्ट ऑस्ट्रेलियामध्ये सामिल झाला आहे. पण तो केवळ खेळाडूंना रनिंग टीप्स देण्यासाठी इथे आला आहे. यावेळचे काही फोटो त्याने सोशल मीडियात शेअर केले आहेत. यात त्याने क्रिकेट त्याचं पहिलं प्रेम असल्याचही सांगितलं आहे. या फोटोंमध्ये उसेन बॅटींग करताना दिसत आहे. उसेनला एक धावपटू होण्याआधी एक क्रिकेटर होण्याची इच्छा होती.