मुंबई: आयपीएलमध्ये आतापर्यंत 66 सामने झाले आहेत. यापैकी गुजरात आणि लखनऊ टीमने प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. आता दोन टीम कोणत्या पोहोचणार याची उत्सुकता आहे. अजून 4 सामने फक्त बाकी आहेत. ज्यामध्ये फक्त दोन टीमचं प्लेऑफपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पांड्याची गुजरात टीम आणि के एल राहुलची लखनऊ टीम दुसऱ्या स्थानावर आहे. आता तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी स्पर्धा रंगणार आहे. तसं पाहायला गेलं तर राजस्थान टीम प्लेऑफमध्ये जाण्याच्या वेशीवर आहे. शेवटचा सामना जिंकला की तिकीट पक्क आहे. 


लखनऊ आणि कोलकाता टीम सोडून 1-1 सामने बाकी आहेक. दिल्ली आणि बंगळुरू टीममध्ये पुन्हा प्लेऑफसाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम आपली शेवटची मॅच खेळणार आहेत. या मॅचमध्ये कोण बाजी मारणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


बंगळुरूचा शेवटचा सामना गुजरातसोबत होणार आहे. तर मुंबईचा दिल्ली विरुद्ध सामना होणार आहे. हैदराबाद आणि पंजाबमध्ये सामने होणार आहे. राजस्थान विरुद्ध दिल्ली सामना होणार आहे. 


राजस्थान आणि बंगळुरू आणि दिल्ली टीम जर सामना जिंकले तर तिघांमध्ये रनरेटमधून कोण प्लेऑफला पोहोचणार हे गणित मांडलं जाईल. त्यामुळे या सामन्याकडे सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. 


तिन्ही टीममध्ये जर 16 पॉईंट्स कॉमन असतील तर त्यांना नेट रनरेटवरून प्लेऑफमध्ये कोण जाईल हे ठरणार आहे. अशा परिस्थितीमध्ये बंगळुरूला 80 धावांच्या फरकाने जिंकवं लागणार आहे. तरच दिल्लीला प्लेऑफमध्ये जाण्यापासून रोखण्यात बंगळुरू यशस्वी होईल.