Pak Vs Aus: पाकिस्तानचा संघ टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरला आहे.  गुरुवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. उपांत्य फेरीतील पराभवानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संघाचे समर्थन केले आहे. इम्रान खान म्हणाले की, बाबर आझम आणि त्यांच्या संघाला कसे वाटले असेल हे मला माहित आहे परंतु त्यांना त्यांच्या खेळाचा अभिमान असला पाहिजे. सध्या इम्रान खान यांचं ट्विट सध्या तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान इम्रान खान ट्विट करत म्हणाले, 'बाबर आझम आणि त्यांच्या संघासाठी... मला माहिती आहे की या क्षणी तुम्हाला सर्वांना कसं वाटत असेल. कारण क्रिकेट क्षेत्रात या गोष्टीचा सामना मी देखील केला आहे. पण तुम्ही ज्या प्रकारे क्रिकेट खेळलात आणि तुमच्या विजयात दाखवलेली नम्रता याचा तुम्हाला अभिमान असायला हवा.' एवढंच नाही तर त्यांनी ऑस्ट्रेलिया संघाचे अभिनंदन देखील केलं. 



पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी सांगितले होते की, जर पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत पोहोचला तर ते अंतिम सामना पाहण्यासाठी यूएईला जाऊ शकतात. पण तसे झाले नाही आणि सेमीफायनलमध्येच ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला.



पाकिस्तानच्या पराभवानंतर लगेचच इम्रान खानच्या पहिल्या पत्नी रेहम खानचे ट्विट आले, ज्यामध्ये त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान खान यांना ट्रोल केलं. रेहम खानने लिहिले की, 'खान साहेब तुम्हाला फायनल पाहण्याचा हट्ट धरू नका असे सांगितले होते.... ' सध्या रेहम यांचं ट्विट तुफान व्हायरल होत आहे. 


रेहम यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, रेहम खान एक ब्रिटिश-पाकिस्तानी पत्रकार आहेत. इम्रान खान आणि रेहम खान 2014 ते 2015 दरम्यान पती-पत्नी होते. दोघांनी लग्नानंतर लगेचच घटस्फोटाची घोषणा केली होती.