नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका दौऱ्या भारतीय क्रिकेट संघ विजयाच्या प्रतीक्षेत असला तरी ब्लाईंड क्रिकेटर्सनी मात्र भारतीयांना विजयी गिफ्ट दिलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय क्रिकेटर्सनी फायनलमध्ये पाकिस्तानचा २ विकटनी पराभव करत जेतेपद उंचावले. भारतीय ब्लाईंड क्रिकेट संघाने सलग दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले. 


पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना ८ बाद ३०७ धावा केल्या.या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने ३८.४ षटकांत दोन विकेट गमावत विजय मिळवलाय 


पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन


पाकिस्तानला हरवत ब्लाईंड वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलेय. मोदी म्हणाले, २०१८चा नेत्रहीन क्रिकेट वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन. यांनी देशाचा गौरव केलाय. तसेच आपल्या खेळ आणि शानदार कामगिरीने भारतीयांना प्रेरित केलेय. हे खऱ्या अर्थाने चॅम्पियन आहेत.



भारताचा अनुभवी स्पिनर हरभजन सिंगनेही संघाचे कौतुक केलेय . टीम इंडियाने दमदार विजय मिळवलाय. ब्लाईंड क्रिकेट वर्ल्डकप जिंकल्याबद्दल अभिनंदन. 


याआधी सेमीफायनलमध्ये भारताने बांगलादेशला ७ विकेटनी हरवले होते. तर दुसरीकडे पाकिस्तानने श्रीलंकेला हरवत फायनल फेरी गाठली होती.