IND vs NZ : कानपूर टेस्टमध्ये खराब अंपायरिंगचा न्यूझीलंडला फटका!
माजी खेळाडूने कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी चुकीच्या निर्णयाबद्दल अंपायर्सना फटकारलं आहे.
कानपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू आहे. दरम्यान या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी अत्यंत खराब अंपायरिंग पाहायला मिळालं. भारताचा माजी सलामीवीर आणि कॉमेंट्रिटर आकाश चोप्राने कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी चुकीच्या निर्णयाबद्दल अंपायर्सना फटकारलं आहे.
कानपूर कसोटीत खराब अंपायरिंग
आकाश चोप्राने ट्विटरवर एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्याने न्यूट्रल अंपायर्सची मागणी केली आहे. कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताच्या डावाच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये शुभमन गिलने डीआरएसचा योग्य वापर करून स्वत:ला वाचवलं. त्यानंतर सातव्या ओव्हरमध्ये एजाज पटेलचा एक चेंडू त्याच्या पॅडवर आदळला पण अंपायने नॉट आऊट दिलं.
आकाश चोप्राकडून प्रश्न उपस्थित
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने रिव्ह्यू न घेण्याचा निर्णय घेतला. पण रिप्लेमध्ये पाहिले असता चेंडू थेट स्टंपकडे जात असल्याचे दिसून आलं.
आकाश चोप्राने ट्विटरवर म्हटलं आहे की, जेव्हा खेळाडू बायो बबलमध्ये राहू शकतात, तेव्हा अंपायरना काय अडचण आहे. आता या सामन्यात पंचांच्या निर्णयाकडे अधिक लक्ष असेल.
शुभमन गिलचा जबरदस्त फायदा
त्यावेळी शुभमन गिल 6 धावांवर खेळत होता आणि नंतर त्याने टीमसाठी 52 टीम्सचं योगदान दिलं. पंचांनी चुकीचा निर्णय दिला, तसंच न्यूझीलंड संघानेही रिव्ह्यू घेण्यात चूक केली.