लंडन : चॅम्पियंस ट्रॉफीला १ जूनपासून सुरुवात होणार आहे. यामध्ये सगळ्यांना उत्सूकता आहे ती भारत-पाकिस्तान सामन्य़ाची. भारताचा पहिला सामना हा पाकिस्तान सोबत होणार आहे. त्यामुळे यामॅच बाबत सगळ्यांनाच उत्सूकता आहे. पण या मॅचवर एक संकट आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान खात्याने ब्रिटेनकडे ढग येत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे काही दिवसांमध्ये पावसाची शक्यता आहे. येत्या चार पाच दिवसात ५ ते १० मिलिमीटर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चॅम्पियंस ट्रॉफीचे सामने कार्डिफ, बर्मिंघम आणि लंडनमध्ये खेळले जाणार आहे. जे चांगल्या पावसासाठी प्रसिद्ध आहेत.


बर्मिंघममध्ये मागील काही दिवसात पाऊस झाला. सोमवारी देखील मोठा पाऊस झाला. ज्यामळे ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील सराव सामना रद्द झाला. आयसीसी चॅम्पियंस टॉफी 2013 च्या फायनलमध्ये देखील पाऊस झाला होता. ज्यामुळे सामना ५० ऐवजी २० ओव्हरचा करण्यात आला होता. ही फायनल मॅच भारताने ५ रनने जिंकली होती. आता हवामान खात्याने वर्तवलेली शक्यता किती प्रमाणात खरं ठरते हे पाहावं लागेल.