WTC Final R Ashwin : आयसीसीच्या (WTC) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. पहिल्या दिवसापासूनच या सामन्यावर ऑस्ट्रेलियाचं (Australia) वर्चस्व पाहायला मिळालं. तर, भारतीय संघ मात्र गटांगळ्या खाताना दिसला. त्यातच संघात महत्त्वाचा फिरकी गोलंदाज आर. अश्विन याला स्थान न दिल्यामुळं मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा या दोघांसह सपोर्ट स्टाफवरही सडकून टीका झाली. अश्विनला संघात का स्थान मिळालं नाही, असा प्रश्न क्रिकेटप्रेमींनाही पडला. तर इथं अश्विनलाही त्याची खंत असल्याचं आता स्पष्ट होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाविरोधात भारताच्या वतीनं जो संघ मैदानात आला त्यात अश्विनचं नाव नसणं हा अनेकांसाठी धक्का बसला. पण, पुढे नेमकं काय झालं ते सर्वांनीच पाहिलं. ज्यावर अश्विननं अखेर मौन सोडलं. एका प्रतिष्ठित माध्यम समुहाशी संवाद साधताना त्याच्या मनातील खंत व्यक्त झालीच. 'अंतिम सामना खेळणं मलाही आवडलं असतं, कारण संघाला इथपर्यंत आणण्यात मीसुद्धा योगदान दिलं होतं', असं तो म्हणाला. 


मागील वर्षीच्या अंतिम सामन्यामध्ये आपण 4 गडी बाद केले होते याची आठवण करून देत ती आपली चांगली कामगिरी असल्याचं त्यानं अधोरेखित केलं. 2018 - 19 नंतर मी जेव्हाजेव्हा परदेशी भूमीवर गोलंदाजीसाठी आलो तेव्हातेव्हा माझा खेळ समाधानकारक होता असं म्हणत त्यानं आपल्या फॉर्मकडे सर्वांचं लक्ष वेधलं. 


हेसुद्धा वाचा : WTC Final नंतर करिअरसाठी ईशान किशननं सोडली Team India ची साथ?


आपण अनेक महत्वाच्या सामन्यांमध्ये संघाला विजयाच्या वळणावर नेलं आहे असं म्हणत अश्विननं काहीसा नाराजीचा सूर आळवत, 'असो, पण हे निर्णय कर्णधार आणि प्रशिक्षकांवर सोडावेत' असं म्हणत त्यांना चार जलदगती गोलंदाज आणि 1 फिरकी गोलंदाज अशा आखणीनं पुढे जायचं होतं या वाक्यावर त्यानं जोर दिला. 


निवृत्तीनंतर खंत राहील... 


अश्विननं आतापर्यंत कधीच क्रिकेट क्षेत्रातून निवृत्तीची चर्चा केली नव्हती. पण, यावेळी मात्र त्याच्या तोंडी हे शब्द पाहायसा मिळाले. तो म्हणाला, 'उद्या जेव्हा मी क्रिकेटमधून निवृत्त होईम तेव्हा मला एका गोष्टीची खंत कायम असेल की एक चांगला फलंदाज होऊनही मी गोलंदाज व्हायला नाही हवं होतं. मी कायम या परिस्थितीशी लढलो आहे. फलंदाज आणि गोलंदाजांशी मी कायम वेगवेगळा वागलो आहे.' अश्विनचे हे उद्गार आणि त्याच्या मनात असणारी खंत त्याची इतक्याच साथ सोडणार नाही हेच स्पष्ट होत आहे.