मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : कबड्डी एक रांगडा आणि आपल्या मातीतला वाटणारा खेळ तर, क्रिकेट मॉडर्न आणि देशातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ. या दोन्ही खेळांमध्ये ताळमेळ साधण्याची किमया केली आहे, ती प्रतीक दाभोलकर या युवकानं. प्रतिक नक्की दोन्ही खेळामध्ये संतुलनं कसं राखतो जाणून घेऊ या. प्रतिक दाभोलकर हा मुंबईचा क्रिकेटपटू, मुंबई प्रमियर लीगमधील ट्रीम्प नाईट्स आणि प्रो-कबड्डीमध्ये पुणेरी पलटण या दोन्ही संघाबरोबर तो जोडला गेलाय. दरम्यान, प्रतीक काही दोन्ही खेळ खेळत नाही. तो आहे खरा क्रिकेटपटू.


रणजी संघामध्येही त्याची निवड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तो मुंबई संघाकडून विविध वयोगटांसाठी क्रिकेट खेळला असून रणजी संघामध्येही त्याची निवड झाली होती. मात्र  अंतिम अकरामध्ये त्याला काही संधी देण्यात आली नाही. मुंबई प्रिमीयर लीगमध्ये तो ट्रीम्प नाईट्सकडून फास्ट बॉलर म्हणून खेळलाय. आता हा क्रिकेटपटू कबड्डी खेळाशी कसा जोडला गेला असा प्रश्न पडला असेल. तर हा फास्ट बॉलर काही कबड्डी खेळत नाही मात्र प्रो-कबड्डीमध्ये पुणेरी पलटण या संघाचा फिटनेस ट्रेनरही होता. त्याला 10 ते 5 नोकरी करण्यात काहीही स्वारस्य नव्हत आणि खेळाशी निगडीतच आपल्याला काहीतरी करायचं होतं यामुळे त्यानं फिटनेस ट्रेनिंगचा भारतात आणि अमेरिकेत प्रशिक्षण घेतलं आणि क्रिकेट खेळता खेळता त्यानं फिटनेस ट्रेनर म्हणूनही काम सुरु केलंय.


दोन्ही खेळांचा दर्जा उंचावण्यासाठी


कबड्डी आणि क्रिकेट तसं पाहिले तर हे टोकाचे खेळ, मात्र प्रतिकला या दोन्ही खेळाशी निगडीत काम करताना कोणतीही समस्या भेडसावत नाही. उलट दोन्ही खेळांचा अनुभव दोन्ही खेळांचा दर्जा उंचावण्यासाठी होत असल्याचं प्रतीकचं म्हणणं आहे.


फिटनेस सेंटरमध्ये फिटनेस ट्रेनर म्हणून काम


26 वर्षीय प्रतीक दाभोलकरनं तीन वर्ष झहीर खानचा फिटनेस सेंटरमध्ये फिटनेस ट्रेनर म्हणून काम केलंय. दरम्यान 50 हजार बेस प्राईज असलेल्या प्रतीकची क्षमता पाहून त्याला   ट्रीम्प नाईट्सनं दोन लाख 60हजारांना खरेदी केलं आणि प्रतीकच्या दोन्ही कौशल्याची क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगू लागली. अशा प्रकारे खेळाडू आणि फिटनेस ट्रेनर असलेला तो कदाचित पहिलाच क्रिकेटर असावा.