मुंबई : चेन्नईने पंजाबला शेवटच्या सामन्यात पाच विकेटनी हरवत आयपीएलमधून बाहेर केले. मुंबई प्ले ऑफमधून बाहेर झाल्यानंतर पंजाबचा शेवटचा सामना चेन्नईसोबत होता. याआधी दिल्लीने मुंबईला ११ धावांनी हरवले होते. त्यामुळे मुंबई आधीच आयपीएलमधून बाहेर गेली होती. मुंबई हरल्यानंतर पंजाबला प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा वाढल्या होत्या. यातच पंजाबची सहमालकीण प्रीती झिंटाने मुंबईच्या पराभवानंतर आनंद व्यक्त केला होता. सोशल मीडियावर प्रीती झिंटाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात मुंबईच्या पराभवानंतर ती किती खुश आहे हे दिसत होते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रीतीवर चांगलीच टीका होत होती. मुंबईच्या पराभवानंतर आनंद व्यक्त करणाऱ्या प्रीतीवर टीकेची झोड बसल्यानंतर प्रीतीने सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रीती झिंटाने ट्विट करुन मुंबईच्या पराभवानंतर आनंद व्यक्त करणे योग्य ठरवले होते. त्याने ट्विट करताना म्हटले, जर मुंबई प्ले ऑफमधून बाहेर जाते तेव्हाच पंजाबला प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी होती. मात्र राजस्थानच्या संघाला अधिक आनंद झालाय कारण चेन्नईने आम्हाला हरवून प्ले ऑफमधून बाहेर काढलेय. आमच्या पराभवामुळे राजस्थान प्लेऑफमध्ये पोहोचला. 



यानंतर प्रीतीने आणखी एक ट्विट केले. यात तिने प्रेक्षकांची माफीही मागितली.