मुंबई : रविवारी दुसऱ्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर पंजाबच्या टीमने चेन्नईला ४ रन्सने पराभूत केलं. हा सामना कोण जिंकेल हे शेवटच्या बॉलपर्यंत निश्चित झालं नव्हतं. या मॅच दरम्यान प्रीती झिंटा मोहालीमध्ये आपल्या टीमच्या फॅन्सला टीशर्ट वाटते. रविवार देखील प्रीती टीशर्ट वाटत होती. पण या दरम्यान असं काही झालं की प्रीती चांगलीच भडकली. एका फॅनने प्रीतीला असं काही म्हटलं की तिला राग अनावर झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक फ़ॅन प्रीतीला असं काही बोलतो जे तिला आवडत नाही. त्यानंतप प्रीती त्याला काही तरी बोलते आणि तेथून निघून जाते. ती काय बोलली हे या व्हिडिओमध्ये ऐकायला नाही आलं.


पाहा व्हि़डिओ



या सामन्यामध्ये पंजाबने चेन्नई सारख्या मज़बूत टीमला ४ रनने हरवलं. गेलने तूफानी 63 रनची खेळी केली. पंजाबने चेन्नईसमोर 197 रनचं लक्ष्य ठेवलं होतं. केएल राहुल, गेल आणि करुण नायर, मयंक अग्रवाल सारख्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करत विजय मिळवला.