मुंबई : भारत आणि इंग्लंड दरम्यान 5 कसोटी मालिका (IND vs ENG ) 4 ऑगस्टपासून नॉटिंघम (Nottingham) येथील ट्रेंट ब्रिज येथे सुरू होत आहे. विराट कोहली या मालिकेत अनेक युवा खेळाडूंवर जबाबदारी देवू शकतो. (IND vs ENG Test Series) 


पृथ्वी शॉ इंग्लंडमध्ये दाखल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ  (Prithvi Shaw) श्रीलंका दौऱ्यावरून परतल्यानंतर मंगळवारी इंग्लंडला पोहोचला आहे, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हाही त्याच्यासोबत उपस्थित होता. टीम इंडियाच्या जखमी कसोटी खेळाडूंची बदली म्हणून दोघांनाही बोलावण्यात आले आहे. दरम्यान, त्यांना क्वारंटाईन नियमांनुसार पहिल्या कसोटीत संधी मिळणार नाही.



पृथ्वी या 3 खेळाडूंची जागा घेऊ शकतो


विशेषत: जखमी शुभमन गिल (Shubman Gill)  याच्या जागी पृथ्वी शॉ याला संधी दिली जाऊ शकते. जर शॉला कसोटीत संधी मिळाली आणि त्याने चांगली कामगिरी केली तर अनेक वरिष्ठ खेळाडूंसाठी ही धोक्याची घंटा असेल.


1.मयांक अग्रवाल


भारत आणि इंग्लंड कसोटी मालिका (IND vs ENG Test Series) सुरू होण्याच्या फक्त 2 दिवस आधी सलामीवीर मयांक अग्रवाल  (Mayank Agarwal) जखमी झाला आणि नॉटिंगहॅम कसोटीतून बाहेर पडला. पहिल्या कसोटीत तो चांगला खेळेल अशी मयांकची अपेक्षा होती. आता पृथ्वी शॉ इंग्लंडमध्ये आल्यामुळे मयांकचे टेन्शन वाढणार आहे, कारण पृथ्वीही मयांक प्रमाणेच ओपनिंग करू शकतो आणि टेस्ट टीममधूनही त्याचे कार्ड क्लीअर करू शकतो.



2. चेतेश्वर पुजारा


ब्रॅड हॉग सारख्या दिग्गजांचाही विश्वास आहे की टीम इंडियामध्ये पृथ्वी शॉ चेतेश्वर पुजारा याच्यासाठी  (Cheteshwar Pujara) सर्वोत्तम बदली ठरू शकतो. उल्लेखनीय म्हणजे, पुजाराने गेल्या दोन वर्षांपासून एकही शतक झळकावले नाही. पुजाराने शेवटचे कसोटी शतक जानेवारी 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले. अशा परिस्थितीत, क्रमांक -3 साठी नवीन चेहऱ्यांची मागणी सातत्याने वाढत आहे.



3. अजिंक्य रहाणे


अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हा भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार असला तरी त्याची जागा पृथ्वी शॉ घेऊ शकतो. त्यामुळे त्याला धोका निर्माण होऊ शकतो. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये  (ICC WTC Final) अजिंक्य रहाणे कडून बऱ्याच अपेक्षा होत्या, मात्र तो पूर्ण करु शकला नाही. रहाणेने अखेर मेलबर्न कसोटीत शतक झळकावले. अशा परिस्थितीत वरिष्ठ खेळाडूंवर जास्त अवलंबून राहणे टीम इंडियाला हानी पोहोचवू शकते, मग पृथ्वीसारख्या तरुणांची भूमिका महत्त्वाची ठरेल.



पृथ्वीने शेवटची कसोटी कधी खेळली?


पृथ्वी शॉ डिसेंबर 2020मध्ये अॅडलेडमध्ये शेवटची कसोटी खेळला. ज्यात विराट कोहलीचा संघ यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या डावात 36 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर पृथ्वीला कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करता आलेले नाही, पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या प्रभावी कामगिरीनंतर त्याला पुन्हा एकदा भारतीय कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे.