IPL 2022: दिल्लीच्या धडाकेबाज फलंदाजाला मोठी शिक्षा, पाहा नेमकं काय घडलं
लखनऊ विरुद्ध सामन्यात दिल्लीच्या स्फोटक फलंदाजावर मोठी कारवाई
मुंबई : आयपीएलमध्ये लखनऊ विरुद्ध दिल्ली सामना खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्लीची कामगिरी अत्यंत वाईट होती. अटीतटीच्या सामन्यात दिल्लीला केवळ 6 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दिल्ली टीमला आधी पराभवाचा आणि नंतर आणखी एक मोठा धक्का बसला.
आयपीएलच्या नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी स्फोटक फलंदाजावर कारवाई करण्यात आली. दिल्लीचा फलंदाज पृथ्वी शॉवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्ली टीमला मोठा धक्का बसला.
मॅच रेफरीचा निर्णय अंतिम मानावा लागतो. मात्र त्याने या नियमाचं उल्लंघन केल्यानं शॉवर कारवाई करण्यात आली आहे. त्याने आचार संहिता 2.20 अंतर्गत लेवल-1 नियमाचं उल्लंघन केल्याचा आरोप पंतवर आहे.
आयपीएलच्या कोड ऑफ कंडक्ट लेव्हल-1 नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला 25 टक्के फी दंड म्हणून भरावी लागणार आहे. पृथ्वी शॉने आपल्यावरील आरोप मान्य केले असून त्याला दंड भरावा लागणार आहे.
लखनऊ विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा खेळताना पृथ्वी शॉची कामगिरी अत्यंत वाईट होती. पृथ्वी शॉ पुन्हा एकदा फ्लॉप ठरला, या सामन्यात त्याने 7 बॉलमध्ये 5 धावा केल्या. 71.43 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना त्याने चौकार मारला. या सामन्यात पृथ्वी शॉची विकेट दुष्मंथा चमीराने काढली.
के एल रालुलवरही दंड
लखनऊचा कर्णधार केएल राहुलला आचारसंहितेच्या लेव्हल-1 चे उल्लंघन केल्याबद्दल मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात आला होता. तर बंगळुरूकडून खेळणाऱ्या मार्कस स्टोइनिसलाही अंपायरला फटकारताना दिसले आणि स्टॉइनिसलाही लेव्हल-1 चे उल्लंघन करण्यास भाग पाडले.