मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये आज चौथा टेस्ट सामना रंगणार आहे. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये ही 5 सामन्यांची टेस्ट सिरीज आहे. पहिल्या तीन टेस्ट सामन्यामध्ये इंग्लंड 2-1 ने आघाडीवर आहे. या सिरीजमध्ये आव्हान कायम ठेवण्य़ासाठी भारताला हा सामना जिंकावा लागणार आहे. चौथ्या सामन्यात भारतीय संघात 2 बदल करण्यात आले आहेत.


टेस्टमध्ये डेब्यू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुरली विजय आणि कुलदीप यादव यांच्या जागी पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारी यांना संघात स्थान मिळालं आहे. चौथ्या टेस्ट आधी सोमवारी टीम इंडियाने सरावाला सुरुवात केली. या सरावादरम्यानचा एक व्हिडिओ देखाल समोर आला आहे. ज्यामध्ये असं दिसतंय की या सामन्यात पृथ्वी शॉ टेस्ट फॉरमॅटमध्ये डेब्यू करु शकतो.


चांगली कामगिरी


पृथ्वी शॉने आपल्या कामगिरीने अनेकांची मनं जिंकली आहेत. आयपीएल ते डोमेस्टिक सीजन आणि इंडिया-ए टीममध्ये देखील त्याने चांगले रन केले आहेत. त्यामुळे टीममध्ये आज त्याला खेळवलं जाऊ शकतं. पृथ्वी शॉ शिखर धवन किंवा केएल राहुलच्या जागी बॅटींग करण्यासाठी येऊ शकतो.


प्रशिक्षकांचं विशेष लक्ष


केएल राहुल आणि शिखर धवन या सिरीजमध्ये काही खास करु शकलेले नाही. सरावादरम्यान पृथ्वी शॉने नेटमध्ये जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगवर बॅटींग केली. बॉलिंग कोच भरत अरुण आणि हेड कोच रवी शास्त्री पृथ्वी शॉवर नजर ठेवून होते.