दुबई : सलामीवीर फाफ डू प्लेसिसच्या 86 रन्सच्या शानदार खेळीनंतर दुबईत खेळल्या गेलेल्या IPL 2021च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. 27 रन्सनी केकआरला नमवल्यानंतर चौथ्यांदा या स्पर्धेचं जेतेपद सीएसकेने पटकावलं आहे. यापूर्वी, सीएसकेने 2010, 2011 आणि 2018 मध्येही आयपीएलचे जेतेपद पटकावलं आहे. CSK ने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चारही जेतेपदे जिंकली आहेत.


CSKवर बक्षिसांचा पाऊस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंतिम सामन्यात धोनीच्या दिग्गजांनी दाखवून दिलं की त्याची टीम आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक का आहे. आयपीएलच्या 14 व्या सीझनच्या अंतिम सामन्यानंतर बक्षिसांचा वर्षाव झाला. चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जला 20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली. तर दुसरीकडे अंतिम फेरीत हरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) संघ 12.5 कोटी रुपयांच्या बक्षिसांचा हक्कदार झाला.


प्राईजमनी


  • चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जला 20 कोटींचा चेक मिळाला

  • उपविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला 12.5 कोटी रुपयांचा चेक देण्यात आला आहे.


धोनीने फॅन्सना दिलं मोठं गिफ्ट


एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने गेल्या वर्षीचं अपयश विसरून या सीझनमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली. पॉईंट्स टेबल दुसरा क्रमांक मिळवला. त्यानंतर जेतेपद पटकावलं आणि त्यांच्या चाहत्यांना सर्वोत्तम गिफ्ट दिलंय.


रोहितपेक्षा धोनी अजूनही मागे


एमएस धोनीची गणना आयपीएलच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. पण नंतर तो नेतृत्वाच्या बाबतीत रोहित शर्माच्या मागे आहे. त्याच्या कर्णधारपदामध्ये 'हिटमॅनने', मुंबई इंडियन्सला 5 वेळा चॅम्पियन बनवलं आहे.