PKL 11: विजय मलिक आणि आशीष नरवालच्या खोलवर चढायांना बचावफळीकडून मिळालेल्या पूरक साथीमुळे प्रो कबड्डी लीगमघ्ये गुरुवारी तेलुगु टायटन्सने यु मुम्बाचा 41-35 असा सहा गुणांनी पराभव केला. या विजयासह तेलुगु टायटन्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आले आहेत. आशिष नरावल आणि विजय मलिकने चढाईत सुपर टेन मिळवून तेलुगुच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. बचावात त्यांच्या सागरने हाय फाईव्ह घेत आपला वाटा उचलला. यु मुम्बाला बचावाच्या आघाडीवर आलेले अपयशच त्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरली. यानंतरही उत्तरार्धात मुम्बाच्या सोमवीरने हाय फाईव्ह पूर्ण केले. मनजीतचे चढाईतील सात आणि अजित चौहानचे सहा गुण मुम्बाला फारसे फायद्याचे ठरले नाहीत. संपूर्ण  सामन्यात मुम्बाच्या बचावफळीने केवळ 9 गुणांची कमाई केली. तुलनेत तेलुगुने बचावात 12 आणि चढाईत 19 गुणांची कमाई केली. पूर्वार्धातील दोन आणि उत्तरार्धातील एक असे यु मुम्बावर चढवलेले तीन लोण सामन्याचा निर्णय ठरविण्यास पुरे पडले. 


उत्तरार्धात काय झाले? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तरार्धात यु मुम्बाच्या बचावपटूंना सूर गवसला. रोहित राघवने राखीव खेळाडू म्हणून पुन्हा एकदा आपली भूमिका चोख बजावली. सुरुवातीलाच मुम्बाने एक लोण परतवून सामन्यात आपले आव्हान राखले होते. तेलुगुच्या बचावपटूंना मात्र या वेळी अपयश आले. आशिष आणि विजय ठराविक अंतराने बाद होत होते. पण, तेलुगुच्या बचावपटूंनी नंतर पुन्हा एकदा जोर लावत मुम्बाच्या चढाईपटूंची कोंडी केली आणि तेलुगुचे वर्चस्व कायम राखले. त्यामुळे लोण चढवून देखिल  मुम्बाला केवळ पिछाडीतील फरक कमी केल्याचे समाधान लाभले. त्यानंतर तेलुगुच्या चढाईपटूंनी उर्वरित वेळ खेळून काढताना सामना निसटणार नाही याची काळजी घेतली. तिसऱ्या चढाईतही त्यांनी बाजी मारली आणि बचावपटूंनी बचाव भक्कम ठेवताना पलटणवर आणखी एक लोण चढवून आपला मोठा विजय निश्चित केला. 


हे ही वाचा: Photos: यशस्वी जयस्वालचं मुंबईतील 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे आलिशान युरोप-इन्स्पायर घर बघितलं का?


पूर्वार्धात काय झाले? 


पूर्वार्धात विजय मलिक आणि आशिष नरवाल यांच्या खोलवर चढायांना मिळालेल्या बचावफळीच्या सुरेख साथीमुळे तेलुगु टायटन्स संघाने मध्यंतराला 25-13 अशी मोठी आघाडी मिळविली होती. तेलुगुचा खेळ इतका वेगवान आणि आक्रमक होता की पूर्वार्धातच सहा मिनिटांच्या अंतराने त्यांनी पलटणवर दोन लोण चढवले. आशिष आणि विजयच्या चढाया मुम्बाच्या बचावफळीला सातत्याने आव्हान देत होत्या. या दोघांवर अंकुश ठेवण्यात मात्र, मुम्बाच्या बचावफळीला अपयश आले. पूर्वार्धातच तेलुगुचे दोन्ही चढाईपटू सुपर टेनच्या उंबरठ्यावर आले होते. विजयने हंगामातील आपले गुणांचे शतकही पूर्ण केले. मुम्बाला चढाईपटूंनी थोडेफार तारले होते. पण, त्यांना बचावपटूंनी साफ निराश केले. अगदी कर्णधार सुनिल कुमारही छाप पाडू शकला नाही. मध्यंतराला खेळ थांबला तेव्हा त्यांच्या नावावर बचावातील केवळ एकच गुण होता.