माऊंट मांगनुई : अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपच्या सुरवातीच्या दोन्ही मॅचमध्ये भारताचा शानदार विजय झाला. भारताच्या या विजयामध्ये मोलाची कामगिरी केली ती कॅप्टन पृथ्वी शॉनं. मैदानामधल्या पृथ्वी शॉची कामगिरी बघितल्यावर प्रेक्षकांना त्याची मैदानाबाहेरची बाजूही पाहायला मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या मॅचवेळी प्रेक्षकांमध्ये असलेल्या एका कुटुंबासोबत असलेल्या बाळाला पृथ्वीनं कडेवर घेतलं. यानंतर पृथ्वी शॉनं हा फोटो सोशल नेटवर्किंगवर शेअर केला. या बाळानं माझा दिवस सत्कारणी लावला, असं ट्विट पृथ्वी शॉनं केलं.


पहिले ऑस्ट्रेलिया आणि मग पपुआ न्यूगिनीचा पराभव केल्यामुळे भारताच्या खात्यात चार अंक आहेत. याचसोबत भारत क्वार्टर फायनलमध्येही दाखल झाला आहे. भारताची पुढची मॅच झिम्बाब्वेबरोबर होणार आहे. भारतानं आत्तापर्यंत ३ वेळा अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला आहे.