सिडनी : चेतेश्वर पुजारा ऑस्ट्रेलिया विरुद्ध १६ वा सामना खेळत आहे. पुजाराने ५९.७० च्या रनरेटने १५५९ रन केले आहेत. सिडनीमध्ये देखील त्याने सिरीजमधलं तिसरं शतक ठोकल्याने एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे. ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध सर्वाधिक रन बनवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याने सुनील गावस्कर आणि विश्वनाथ यांना मागे टाकलं आहे. सुनील गावस्करांनी  ऑस्ट्रेलिया विरुद्ध २० सामन्यांमध्ये १५५० रन केले होते. तर गुंडप्पा विश्वनाथ यांनी १८ सामन्यांमध्ये १५३८ रन केले आहेत.


५ खेळाडू अजूनही पुजाराच्या पुढे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक रन करणाऱ्यांच्या यादीत पुजारा सहाव्या क्रमाकांवर आहे.


१. सचिन तेंडुलकर - ३६३०
२. व्हीव्हीएस लक्ष्मण - २४३४
३. राहुल द्रविड - २१४३ 
४. वीरेंद्र सेहवाग - १७३८ 
५. विराट कोहली - १६०४  
६. चेतेश्वर पुजारा - १५५९


चेतेश्वर पुजारा कर्णधार विराट कोहलीच्या जवळ पोहोचला आहे. विराट कोहलीला मागे टाकण्याची देखील संधी पुजाराकडे आहे. 


ऑस्ट्रेलियात एकाच सिरीजमध्ये ३ शतक


चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यांच्याच धरतीवर एका सीरीजमध्ये ३ शतक ठोकले आहेत. असं करणारा तो तिसरा भारतीय आहे. या यादीत कोहली पहिल्या आणि सुनील गावस्कर दुसऱ्या स्थानी आहे. पुजाराने पाचव्या विकेटसाठी विहारी सोबत ७५ रन जोडले आणि टीमला ३०३ रनपर्यंत पोहोचवलं. पुजाराने २५० बॉलचा सामना करत १६ फोर मारले आहेत.