जयपूर : भारत आणि इंडिजच्या पहिल्या सामन्यात पुजाराने असं काही केलं जे सहज पाहायला मिळत नाही. पुजाराने राजकोट टेस्टमध्ये पहिल्या दिवशी बॅटींग करताना आपल्या खिशात पाण्याची बाटली ठेवली होती. असं याआधी कदाचित कोणीच केलं नसेल.


खिशातच ठेवली बाटली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकोटमध्ये सध्या उन्हाचा कडाका आहे. ज्यामुळे खेळाडूंना त्रास होत आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा पवेलियनमधून कोणाला बोलवण्यापेक्षा पुजाराने त्याच्या खिशातच बाटली ठेवली होती. पुजाराने सामन्यात 86 रन्सची दमदार खेळी केली.



67 बॉलमध्ये अर्धशतक


इंडिजच्या विरोधात त्याने 67 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. भारताला के एल राहुलच्या रुपात पहिला झटका लागल्यानंतर पुजाराने भारताची बाजु सांभाळली. पृथ्वी शॉ सोबत त्याने शतकीय इनिंग खेळली.


पृथ्वी शॉचं पहिलं शतक 


पृथ्वी शॉने 98 बॉलमध्ये आपल्ं कसोटी सामन्यातील पहिलं शतक ठोकलं आहे. भारताने टॉस जिंकल्यानंतर आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघामध्य़े 2 कसोटी सामने होणार आहेत. इंग्लंड विरुद्धचा भारताचा दौरा खराब ठरला पण या सिरीजमधून भारताला पुन्हा कमबॅक करण्याची संधी आहे. यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताला सामने खेळायचे आहेत.