आयपीएल प्ले ऑफच्या तीन टीम निश्चित, दोघांमध्ये अजूनही चुरस
दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये पराभव झाल्यामुळे प्ले ऑफला जायचं मुंबईचं स्वप्न भंगलं आहे.
मुंबई : दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये पराभव झाल्यामुळे प्ले ऑफला जायचं मुंबईचं स्वप्न भंगलं आहे. पण राजस्थान किंवा पंजाब यांच्यामध्ये प्ले ऑफला जायची चुरस अजूनही कायम आहे. या दोघांपैकी एकच टीम प्ले ऑफमध्ये प्रवेश करू शकते. चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबचा ५३ किंवा त्यापेक्षा अधिक रननं विजय होणं आवश्यक आहे. एवढ्या फरकानं पंजाबचा विजय झाला तर ते प्ले ऑफला क्वालिफाय होतील. राजस्थान रॉयल्सचा १४ पैकी ७ मॅचमध्ये विजय तर ७ मॅचमध्ये पराभव झाल्यामुळे त्यांच्या खात्यात १४ पॉईंट्स आहेत. त्यामुळे ते चौथ्या क्रमांकावर आहेत. तर पंजाबच्या टीमला १३ पैकी ६ सामन्यात विजय मिळवता आला असून ७ मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.
तीन टीम प्ले ऑफमध्ये
हैदराबाद, चेन्नई आणि कोलकात्याच्या टीम याआधीच प्ले ऑफमध्ये क्वालिफाय झाल्या आहेत. आता राजस्थान किंवा पंजाबपैकी एक टीम प्ले ऑफमध्ये खेळेल. २२ मे रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहिला क्वालिफायर सामना होईल. तर २३ मे रोजी ईडन गार्डनवर एलिमिनेटर सामना होईल. २५ मे रोजी ईडन गार्डनवर क्वालिफायरचा दुसरा सामना रंगेल आणि २७ मे रोजी वानखेडे स्टेडियमवर आयपीएलची फायनल होईल.