पी.व्ही. सिंधूची हाँगकाँगच्या क्वार्टरफायनलमध्ये धडक
भारताची ऑलिम्पिक मेडलिस्ट बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही. सिंधूनं हाँगकाँगच्या क्वार्टरफायनलमध्ये धडक मारली आहे.
नवी दिल्ली : भारताची ऑलिम्पिक मेडलिस्ट बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही. सिंधूनं हाँगकाँगच्या क्वार्टरफायनलमध्ये धडक मारली आहे.
अयो ओहोरीला पराभवाचा धक्का
दुसऱ्या राऊंडमध्ये सिंधूनं जपानच्या अयो ओहोरीला 21-14, 21-17नं पराभूत करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला.
चीन ओपन सीरिज विजेतीशी होणार मुकाबला
आता क्वार्टर फायनलमध्ये सिंधूचा मुकाबला चीन ओपन सीरिज विजेती अकाने यामागुची हिच्याशी होईल. यामगुची सध्या चांगल्या फॉर्मात असून तिनं आतापर्यंत चारवेळा फायनलमध्ये धडक मारली असून तीनं चीन ओपनच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे.
यामुळे क्वार्टर फायनमलमध्ये सिंधूसमोर यामागुची कडवं आव्हान उभं करण्याची शक्यता आहे.