नवी दिल्ली : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू महिला एकेरीच्या रँकिगमध्ये दुसऱ्या स्थानी पोहोचलीये. गुरुवारी ही रँकिंग जाहीर करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या रँकिगमध्ये चीन तैपेईची ताय जू यिंग पहिल्या स्थानी आहे. काही दिवसांपूर्वीच कोरिया ओपनचे जेतेपद मिळवलेल्या सिंधूने दुसऱ्यांदा रँकिंगमध्ये दुसरे स्थान मिळवलेय. ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक मिळवल्यानंतर ६ एप्रिलला सिंधू दुसऱ्या स्थानावर पोहोचली होती. सिंधूच्या रँकिंगमध्ये दोन स्थानांची सुधारण होत ती आता पुन्हा दुसऱ्या स्थानावर आलीये. 


भारताची फुलराणी सायना नेहवाल या रँकिगमध्ये १२व्या स्थानी आहे. ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवलेली स्पेनची कॅरोलिना मरिन पाचव्या स्थानावर कायम आहे. तर वर्ल्ड चॅम्पियन नोझोमी ओकुहारा आठव्या स्थानावर पोहोचलीये. पुरुषांच्या एकेरी रँकिंगमध्ये किदम्बी श्रीकांत आठव्या स्थानी कायम आहे. त्यासोबतच साई प्रणीत आणि एच.एस.प्रणॉय एका स्थानांनी घसरुन अनुक्रमे १७व्या आणि १९व्या स्थानी घसरलेत.