सेऊल : भारताची बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूने कोरिया ओपन सुपर सीरिजच्या फायनलमध्ये धडक मारलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेमीफायनलमध्ये तिने चीनच्या ही बिनजियाओचा २१-१०, १७-२१ आणि २१-१६ असा तीन गेममध्ये पराभव केला. 


पहिला गेम सिंधूने एकतर्फी जिंकला. दुसऱ्या गेममध्ये बिनजियाओने जोरदार पुनगरामन केले आणि सिंधूला निष्प्रभ केले. 


तिसऱ्या गेमही सुरुवातीला चुरशीचा झाला मात्र १५व्या पॉईंटसनंतर सिंधूने आघाडी घेण्यास सुरुवात केली आणि ती टिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत तिसरा गेम आपल्या नावे केला. फायनलमध्ये तिचा मुकाबला जपानच्या नोझोमी ओकुहाराशी होणार आहे. 


वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेतही सिंधूने फायनलमध्ये धडक मारली होती. मात्र तिला फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला.