The World’s Highest-Paid Female Athletes 2022: फोर्ब्सने सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीत पीव्ही सिंधू (PV Sindhu) 12व्या स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे टॉप 25 मध्ये पीव्ही सिंधू ही एकमेव भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.जाणून घेऊयात सिंधूची एकूण संपत्ती किती आहे.


सिंधूने दुसऱ्यांदा मिळवलं स्थान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीव्ही सिंधूची (PV Sindhu) यंदाची कमाई 7.1 मिलियन डॉलर म्हणजेच 58.6 कोटी रुपये आहे. तिने मैदानावर 82 लाख रुपये कमावले आहेत, तर मैदानाबाहेर त्याने 57.8 कोटी रुपये कमावले आहेत. याआधी 2019 मध्ये बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूलाही फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिलांच्या यादीत स्थान मिळाले होते.तिने 40 कोटी रुपये कमावले होते. सिंधू या यादीत 13 व्या क्रमांकावर होती. 2018 मध्ये सिंधूची कमाई 60 कोटी होती.


इतकी संपत्ती येते कमवते कूठुन?


सिंधू  (PV Sindhu) जाहिरातीतून भरपूर कमाई करते. सिंधू बँक ऑफ बडोदा, पॅनासोनिक, ब्रिजस्टोन, मूव्ह, जेबीएल, फ्लिपकार्ट, मिंत्रा, नोकिया आणि बूस्ट सारख्या ब्रँड्सचे प्रमोशन करते.2019 मध्ये सिंधूने चीनी ब्रँड ली निंगसोबत 4 वर्षांचा करार केला. सिंधूने यासाठी 50 कोटी रुपये घेतले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिंधूची एकूण संपत्ती 10 मिलियन डॉलर (सुमारे 82 कोटी रुपये) आहे.


दोनदा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलय


बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने  (PV Sindhu) गेल्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. त्याआधी भारताच्या या स्टार खेळाडूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकून इतिहास रचला होता. तसेच कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला एकेरीत सुवर्णपदक आणि ऑगस्टमध्ये मिश्र सांघिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. याशिवाय पीव्ही सिंधूच्या नावावर देशांतर्गत स्पर्धेत अनेक विक्रम आहेत.