नदालचं लाल मातीचा बादशाह, फ्रेंच ओपन फायनलमध्ये वावरिंकाला लोळवलं
क्ले-कोर्टचा अनभिषिक्त सम्राट हे बिरुद स्पेनच्या राफाएल नदालनं कायम ठेवलं आहे.
पॅरिस : क्ले-कोर्टचा अनभिषिक्त सम्राट हे बिरुद स्पेनच्या राफाएल नदालनं कायम ठेवलं आहे. नदालनं दहाव्यांदा फ्रेंच ओपनला गवसणी घालण्याचा भीमपराक्रम केला.
फायनलमध्ये स्वित्झर्लंडच्या स्टानिस्लास वावरिंकावर मात करत त्यानं फ्रेंच ओपनवर आपलं नाव कोरलं. त्यानं 6-2, 6-3, 6-1 नं वावरिंकाचा धुव्वा उडवला. आजपर्यंत जे कोणत्याही टेनिसपटूला जे मजलं नाही ते त्यानं करुन दाखवलं.
फ्रेंच ओपनची फायनल त्यानं अगदी सहज जिंकली. त्याच्या धडाक्यासमोर वावरिंकाचं काहीच चाललं नाही. दुखापतींवर मात करत नदालनं टेनिसकोर्टवर केलेलं कमबॅक निश्चितच कौतुकास्पद आहे. आता त्याच्या नावावर 15 ग्रँडस्लॅम विजेतेपद आहेत.