मुंबई : आयपीएल २०१८मध्ये दोन वर्षाच्या बंदीनंतर परतलेल्या राजस्थानने मंगळावारी घरच्या मैदानावर पंजाबला १५ धावांनी हरवले. या विजयासोबत राजस्थानने प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा जिवंत ठेवल्यात. या सामन्यात पंजाबकडून लोकेश राहुल आणि अँड्र्यू टायने दमदार कामगिरी केली. मात्र संघाला पराभवापासून वाचवू शकले नाही. राहुलने ९५ धावांची खेळी केली. या सामन्यात अजिंक्य रहाणेने शानदार कॅच घेतला. हा कॅच इतका जबरदस्त होता की सगळेजण रहाणेची स्तुती करु लागले. मात्र प्रीती झिंटा हैराण झालेली दिसत होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्यात पंजाबने पहिल्यांदा गोलंदाजी करताना राजस्थानला २० षटकांत ८ विकेट गमावताना १५८ धावांवर रोखले. राजस्थानकडून जोस बटलरने शानदार ८२ धावांची खेळी केली. या सामन्यात राजस्थानने मोठी धावसंख्या उभारली नाही मात्र यावेळी पंजाबचे फलंदाज राजस्थानच्या समोर नतमस्तक झालेले पाहायला मिळाले. या सामन्यात राजस्थानच्या गोलंदाजांनी कमाल केली आणि राजस्थानला  विजय मिळवून दिला.


 


या सामन्यात अजिंक्य रहाणेने कमालीची फिल्डिंग केली. अजिंक्यने आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक स्तरावरील सामन्यांत अनेकदा जबरदस्त कॅच घेतलेत. त्याने १२१ आयपीएल सामन्यात ४८ कॅच घेतलेत.