हितसंबंधाप्रकरणी राहुल द्रविड लोकपालना स्पष्टीकरण देणार
माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आज बीसीसीआयचे नैतिक अधिकारी डी.के. जैन यांच्यासमोर हितसंबंधाबाबत आपलं स्पष्टीकरण देणार आहे.
मुंबई : माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आज बीसीसीआयचे नैतिक अधिकारी डी.के. जैन यांच्यासमोर हितसंबंधाबाबत आपलं स्पष्टीकरण देणार आहे. द्रविड हा सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख आहे. याखेरीज तो इंडिया सिमेंट कंपनीचा उपाध्यक्ष आहे. या कंपनीकडे आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जची मालकीही आहे. यामुळे हितसंबंधा मुद्दा उपस्थित करत मध्ये प्रदेश क्रिकेट संघटनेचे सदस्य संजीव गुप्ता यांनी बीसीसीआयकडे तक्रार केली होती. याप्रकरणी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं प्रमुखपद स्वीकारण्यापूर्वीच आपण इंडिया सिमेंटकडून रजा घेतली असल्याचं उत्तर बीसीसीआयला दिलं आहे.
राहुल द्रविड याची राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए)च्या प्रमुखपदी निवड करण्यात आली. ही निवड होत असतानाच द्रविड इंडिया सिमेंट्सचा उपाध्यक्षही आहे. या कंपनीकडे आयपीएलच्या चेन्नई सुपरकिंग्सच्या टीमचे मालकी हक्कही आहे. हे परस्पर हितसंबंधाचं प्रकरण असल्याचा आरोप मध्य प्रदेश क्रिकेट संघाचे सदस्य संजीव गुप्ता यांनी केला. याबाबत संजीव गुप्ता यांनी बीसीसीआयचे लोकपाल डीके जैन यांच्याकडे तक्रार केली.
याआधी संजीव गुप्ता यांनीच परस्पर हितसंबंधांच्या मुद्द्यावरून सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याविरोधात हितसंबंधांच्या मुद्द्यावरून लोकपालकडे तक्रार दाखल केली होती.