India won t20 world cup : टी20 वर्ल्डकप जेतेपदाचं स्वप्न अखेर टीम इंडियाने खरं करून दाखवलं आहे. भारताने साऊथ अफ्रिकेचा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरलं. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात आणि राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाने विजय मिळवलाय. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं भारतानं टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर जंगी सेलिब्रेशन केलं. त्यानंतर हेड कोच म्हणून भारतासोबत अखेरची भूमिका बजावणाऱ्या राहुल द्रविडने (Rahul Dravid Celebration) देखील उत्साह साजरा केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात राहुल द्रविडनेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राहुल द्रविडने देखील खास पद्धतीने विजय साजरा केला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा हा शेवटचा सामना होता. विराट कोहलीने राहुल द्रविड यांच्या हातात टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची ट्रॉफी आणून दिली. त्यानंतर द्रविडने देखील ट्रॉफी उंचावली अन् जल्लोष केला.


पाहा Video



 भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 169 धावा करू शकला.



दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शामसी.


भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.