IND vs AUS 2nd Test : के एल राहूलचा पत्ता कट? राहूल द्रविड स्पष्टच म्हणाला...
Rahul Dravid on KL Rahul Performance : टीम इंडियाचा सलामीवीर के एल राहूल (KL Rahul) गेल्या काही सामन्यापासून फलंदाजीत अपयशी ठरतोय. ऑस्ट्रेलिया (Australia) विरूद्धच्या टेस्ट सामन्यातही राहूल फारशी अशी कमालीची कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे क्रिकेट फॅन्स चांगलेच भडकले आहे.
Rahul Dravid on KL Rahul Performance : टीम इंडियाचा सलामीवीर के एल राहूल (KL Rahul) गेल्या काही सामन्यापासून फलंदाजीत अपयशी ठरतोय. ऑस्ट्रेलिया (Australia) विरूद्धच्या टेस्ट सामन्यातही राहूल फारशी अशी कमालीची कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे क्रिकेट फॅन्स चांगलेच भडकले आहे, त्यांनी त्याच्याऐवजी दुसऱ्या खेळाडूला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्याची मागणी केली आहे. मात्र आता या प्रकरणात टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहूल द्रविड (Rahul Dravid) आणि कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) स्पष्टच भूमिका मांडली आहे.
हे ही वाचा : रवींद्र जडेजाचा भीमपराक्रम! वर्ल्ड कप विजेत्या दिग्गज खेळाडूचा रेकॉर्ड ब्रेक
राहूलची अपयशी कामगिरी
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात राहूलने (KL Rahul) पहिल्या डावात 17 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात टीम इंडियाला (Team India) 115 धावांचे लक्ष्य गाठायचे होते. हे लक्ष्य टीम इंडियाला आणखीणच सहज गाठला आले असते. मात्र राहूल टीम इंडियाला चांगली सुरूवात करून देऊ शकला नाही. आणि तो निव्वळ 1 धावा करून आऊट झाला. तर पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडिया पहिलाच डाव खेळली. या डावात देखील त्याला 20 धावाच करता आल्या. त्यामुळे त्याच्या सततच्या अपयशी कामगिरीमुळे तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. तसेच त्याला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर करण्याची मागणी होतेय.
हे ही वाचा : रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास! गेल्या 23 वर्षात असा रेकॉर्ड कोणालाच जमला नाही
राहूल द्रविड काय म्हणाला?
राहूलच्या (KL Rahul) सततच्या अपयशी कामगिरीवर राहूल द्रविड (Rahul Dravid) म्हणाला की, प्रत्येक खेळाडूच्या कारकीर्दीत अशी परिस्थिती येते. त्याने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अन्य देशात शतक झळकावली आहेत. मला विश्वास आहे की यातून बाहेर पडण्यासाठी त्याच्याकडे गुणवत्ता आहे.त्यामुळे आम्ही लोकेश राहूलच्या पाठिशी उभे आहोत. असे विधान करून द्रविड (Rahul Dravid) यांनी पुन्हा राहूलची पाठराखण केली आहे.
रोहितचं मोठं विधान
आम्ही लोकेशला पाठिंबा देणार आहोत. त्याच्यात क्षमता आहे. अशा खेळपट्टीवर धावा करण्याचं मेथड तुम्हाला शोधता आले पाहिजे. आम्ही एखाद्या खेळाडूच्या कामगिरीपेक्षा संघाची कामगिरी कशी झाली यावर लक्ष देत आहोत, असे रोहित शर्मा म्हणालाय.त्यामुळे रोहितने (Rohit Sharma) देखील त्याची पाठराखण केली आहे.
दरम्यान ऑस्ट्रेलियाने दिल्ली कसोटीत प्रथम फलंदाजी करून पहिल्या डावात 263 धावा केल्या होत्या. अश्विनने (ravichandran ashwin) 37 आणि अक्षर पटेलने 74 धावांच्या जोरावर भारताला पहिल्या डावात 262 धावा करता आल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या स्पिनर जोडीने हाणून पाडला आणि त्यांना 113 धावात रोखले. यामध्ये जडेजाने 7 तर आश्विनने (ravichandran ashwin) 3 विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला (IND vs AUS 2nd Test) 115 धावांचे लक्ष्य दिले होते. टीम इंडियाने 6 विकेट राखून हे लक्ष्य सहज पुर्ण केले.या विजयासह टीम इंडियाने 2-0ने मालिकेत आघाडी घेतली आहे.