14 वर्षांपूर्वीच भारतीय नेतृत्त्वक्षमतेची चमक दाखवणाऱ्या रोहितला द्रविडनं पाहिलं आणि...
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना बुधवारी होणार आहे.
मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना बुधवारी होणार आहे. या सामन्यातून भारतीय क्रिकेटच्या एका नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा कर्णधार म्हणून या फॉरमॅटमध्ये डेब्यू करणार आहे. त्याच वेळी, नवीन मुख्य प्रशिक्षक द्रविडचा कार्यकाळ सुरू होत आहे.
मंगळवारी, सामन्याच्या पूर्वी राहुल द्रविडने पत्रकार परिषदेत घेतली. ज्यामध्ये T20 संघाचा कर्णधार रोहित शर्मा देखील उपस्थित होता. यादरम्यान द्रविडने रोहित शर्माचंही जोरदार कौतुक केलंय. यावेळी द्रविडने रोहित शर्मासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
राहुल द्रविड म्हणाला, "मला वाटतं वेळ लवकर निघून जातो, नाही का? खरं तर, मी रोहितला आयर्लंड दौऱ्यापूर्वीपासून ओळखतो. जेव्हा आम्ही मद्रासमध्ये चॅलेंजर ट्रॉफी खेळत होतो. आम्हा सर्वांना माहित होतं की रोहित खूप खास असणार आहे. इतक्या वर्षांनंतर मी त्याच्यासोबत काम करणार आहे, ज्याचा मी विचारही केला नव्हता."
द्रविड म्हणाला, "त्याने जे काही केलं ते प्रामाणिकपणे पाहणं खूप छान आहे. एक लीडर आणि माणूस म्हणून रोहित ज्या प्रकारे पुढे आला आहे, तुम्हाला माहिती आहे का की, 14 वर्षांनंतर तो आता काय आहे? आणि या खेळात देशाने जे काही मिळवले, त्याचं श्रेय खरोखरच एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून मिळवलेल्या रोहितला द्यायला हवं."
द्रविड म्हणाला, “मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून त्याचं यशंही अभूतपूर्व आहे आणि तो वारसा पुढे नेण्यात तो सक्षम आहे. मुंबई, क्रिकेट आणि भारतीय क्रिकेटचा वारसा सांभाळणं सोपं नाही हे स्पष्टपणे माहीत आहे."
रोहित म्हणाला, '2007 मध्ये जेव्हा माझी निवड झाली तेव्हा मला बंगळुरूमधील एका शिबिरात त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. त्यावेळी माझं बोलणं फार कमी होतं आणि मी खूप घाबरले होतो."