U-19 World Cup Final: सामन्यामध्ये पावसाचं व्यत्यय
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या अंडर 19 वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्टेलियाने भारतापुढे 217 रनचं टार्गेट दिलं आहे.
डरबन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या अंडर 19 वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्टेलियाने भारतापुढे 217 रनचं टार्गेट दिलं आहे.
पावसाचं व्यत्यय
भारताची सुरुआत कर्णधार पृथ्वी शॉ आणि मनजोत कालराने केली आहे. दोन्ही बॅट्समन खास करुन पृथ्वी शॉ विकेट वाचवण्यासाठी प्राथमिकता देतांना दिसत आहे. 4 ओव्हर पर्यंत भारताने कोणतीही विकेट न गमवता 23 रन केले. पृथ्वी शॉने 18 बॉलमध्ये एक फोरसह 10 रन केले. मनजोत कालराने केवल 7 बॉलमध्ये एक सिक्ससह 9 रन केले.
216 रनवर ऑलआऊट
ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 216 रनवर ऑलआऊट झाला आहे. ऑस्ट्रेलियाकडून जॉनथन मेरलोने सर्वाधिक 76 रन केले. अनुकूल रॉयच्या बॉलवर शिवा सिंगने कॅच करत त्याला माघारी पाठवलं. त्यानंतर परम उपलने 34 रन केले. इतर ऑस्ट्रेलियाचे कोणतेही खेळाडू चांगले रन करु शकले नाही.