Sanju Samson कडून IPL च्या नियमांचं उल्लंघन; `त्या` चुकीमुळे कर्णधाराला भरावा लागणार दंड
चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध विजय मिळवून राजस्थानच्या टीमने पॉईंट्स टेबलमध्ये पहिलं स्थान गाठलं खरं, मात्र हा विजय संजू सॅमनला चांगलाच महागात पडला आहे.
Sanju Samson fined : सध्या पॉईंट्स टेबलच्या (IPL 2023) टॉपवर असलेली राजस्थान रॉयल्सची (Rajasthan Royals) टीम यावेळी चांगला खेळ करताना दिसतेय. यंदाची आयपीएल जिंकण्यासाठी राजस्थानची टीम देखील दावेदार मानली जातेय. बुधवारी झालेल्या सामन्यात राजस्थानच्या टीमने चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) त्यांच्या घरात पराभव केला. अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या सामन्यामध्ये अखेर 3 रन्सने राजस्थानने बाजी मारली. या सामन्यात राजस्थानचा विजय झाला खरा मात्र कर्धणार संजू सॅमसनला (Sanju Samson) मोठा धक्का बसला आहे. (Sanju Samson fined Rs 12 lakh to slow overrate)
चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध विजय मिळवून राजस्थानच्या टीमने पॉईंट्स टेबलमध्ये पहिलं स्थान गाठलं खरं, मात्र हा विजय संजू सॅमनला चांगलाच महागात पडला आहे. आयपीएलनच्या नियमांनुसार, सॅमसनवर लाखो रूपयांचा दंड लागला आहे.
राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार संजू सॅमसनवर कोड ऑफ कंडक्ट अंतर्गत स्लो ओव्हर रेटच्या नियमांना मोडल्यामुळे 12 लाखांचा दंड लागला आहे. चेन्नईविरूद्धच्या सामन्यात राजस्थानच्या टीमने निर्धारित वेळेमध्ये ओव्हर्स पूर्ण केल्या नाहीत. यामुळे कर्णधार संजूला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
फाफ डुप्लेसिसला देखील बसला दंड
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार फाफ डू प्लेसिसला देखील संजूप्रमाणे दंड लागला होता. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यादरम्यान त्याला हा दंड भरावा लागला. या सामन्यामध्ये स्लो ओव्हर रेट ठेवल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं होतं. स्लो ओव्हर रेट (Slow Over Rate) ठेवल्याबद्दल दोषी आढळल्याने त्यावेळी आरसीबीचा कर्णधार (RCB Captain Faf du Plessis) ड्यू प्लेसिला 12 लाख रूपयांचा दंड भरावा लागला होता.
चेन्नईविरूद्ध राजस्थानचा विजय
चेपॉक स्टेडियमवर बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगला होता. शेवट्या बॉलपर्यंत हा सामना रंगला होता. महेंद्र सिंग धोनी हा सामना जिंकवून देणार असं वाटत असताना संदीप शर्माच्या गोलंदाजीपुढे चेन्नईचा पराभव झाला. राजस्थानच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 175 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने विजयासाठी कडवी झुंज दिली. मात्र धोनीच्या खेळीनंतरही टीमला 3 रन्सने पराभवाचा सामना करावा लागला.