जयपूर : आयपीएलचा १२वा मोसम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्व क्रिकेट चाहते दरवर्षी आयपीएलची आवर्जुन वाट पाहत असतात. आयपीएलच्या प्रत्येक मोसमामध्ये काही ना काही बदल हे होतच असतात. राजस्थान रॉयलचा संघ यंदाच्या आयपीएलच्या मोसमात गुलाबी रंगाच्या जर्सीत खेळताना दिसणार आहे. याआधी राजस्थान रॉयल्सचा संघ हा निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये खेळायचा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयपूर पिंक सिटी म्हणून ओळखली जाते. याच कारणामुळे राजस्थानच्या जर्सीचा रंग बदलून गुलाबी करण्यात आला आहे. राजस्थान रॉयलच्या संघ प्रशासनाने एक निवेदन जाहीर केलं आहे. यात म्हटलं आहे की, 'जयपूरला गुलाबी नगरी म्हणून ओळखल जाते. जोधपुर 'गुलाबी बलुआ' या दगडासाठी प्रसिद्ध आहे. उद्यपूरमध्ये गुलाबी संगमरवराचे उत्पादन घेतले जाते. हा गुलाबी रंग संघासाठी अनुकुल आहे. यामुळे संघाच्या चाहत्यांमध्ये संघाप्रती आपुलकीची भावना निर्माण होईल'.



तसेच या आगामी मोसमासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू आणि राजस्थान रॉयलचा माजी कर्णधार शेन वॉर्न याची संघाच्या ब्रँड एंबेसेडर पदी निवड करण्यात आली आहे. शेन वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थान रॉयलच्या संघाने आयपीएलच्या पहिल्या म्हणजेच २००८ साली जेतेपद मिळवले होते.


यावर शेन वॉर्न म्हणाला की, 'राजस्थान रॉयल्स संघासोबत जोडल्यामुळे मी आनंदी आहे. तसेच संघ प्रशासनाच्या सहकार्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. आपली एक नवी ओळख निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच मला आपल्या संघाचा गुलाबी अवतार चांगलाच आवडला आहे'. हा नवा लूक क्रिकेट चाहते आणि प्रशंसकांना ही आवडेल अशी आशा यावेळेस शेन वॉर्नने व्यक्त केली