SRH vs RR, IPL 2023: धमाकेदार अंदाजात सुरू झालेल्या आयपीएलच्या चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) लोळवत आयपीएल 2023 मधील पहिला विजय नोंदवला आहे. पहिल्या सामन्याने राजस्थानने 72 धावांनी मोठा विजय नोंदवला. राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो सलामीवीर जॉस बटलर (Jos Buttler) आणि कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson). तर गोलंदाजीत देखील ट्रेंट बोल्डने (Trent Boult) आणि युझी चहलने (Yuzvendra Chahal) हैदराबादच्या फलंदाजांना मैदानात टिकू दिलं नाही.


Jos Buttler चं वादळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॉस बटलरचं (Jos Buttler) आणि जयस्वालने (Yashasvi Jaiswal) आक्रमक सुरूवात केली. बटलरने 20 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. त्यानंतर फारूकीने (Fazalhaq Farooqi) बटलरला तंबुत पाठवलं. प्रथम टॉस जिंकत कॅप्टन भुवनेश्वर कुमारने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बटलर बाद झाल्यानंतर कॅप्टन संजूने आक्रमक फलंदाजीला सुरूवात केली आणि 55 धावांची वादळी खेळी केली. अखेरीस हेटमारने 22 धावा करत 203 धावा स्कोरबोर्डवर उभा केल्या.


Boult, Chahal ने मोडलं कंबरडं


पहिल्या डावात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) 203 रन्स केल्याने आयपीएल 2023 मधील 200 धावांचा टप्पा क्रॉस केलेला पहिला संघ हा आरआर (RR) ठरला आहे. राजस्थानने दिलेल्या 204 धावांचं आव्हान पार करताना हैदराबादचा संघ पत्त्यासारखा कोसळला. हैदराबादने पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट गमावले. बोल्टच्या आक्रमणासमोर फलंदाज टिकले नाहीत. त्यामुळे बोल्टने हैदराबादचं कंबरडं मोडलं. त्यानंतर चहलने फिरकीची जादू दाखवली.


पाहा Video -



दरम्यान, पहिल्याच सामन्याच राजस्थानने रॉयल (Rajasthan Royals) विजय नोंदवला आहे. त्यामुळे आता राजस्थानचे आगामी सामने आणखी रंगतदार होणार असल्याचं दिसतंय. लखनऊने दिल्ली कॅपिटल्सला 50 रन्सने पराभवाची धुळ चारली होती. त्यानंतर आणखी मोठा विजय हा राजस्थानने मिळवला आहे. त्यामुळे फिरकीची जादू, बॉलिंगची धार आणि आक्रमक फलंदाजी, असं त्रिकूट राजस्थानकडे असल्याचं दिसून आलं आहे.