मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड (Rahul Dravid) याचा आज ४८ वा वाढदिवस आहे. जगभरातील क्रिकेट चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत. यातच आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स टीमने देखील द्रविडला वेगळ्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. द्रविड हा राजस्थान संघाचा माजी कर्णधार आणि मेंटॉर देखील आहे. ट्विटरवर एक पोस्टर शेअर करत द्रविडला अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. द्रविड हा द वॉल म्हणून जगात प्रसिद्ध आहे. त्यावरच दीवार सिनेमाच्या पोस्टरवरुन हा वेगळा पोस्टर बनवण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच पोस्टर अभिताभ बच्चन यांच्या दीवार सिनेमाचा होता. पण या पोस्टरमध्ये अमिताभ यांच्या जागी द्रविड आहे. या पोस्टरच्या वर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि हर्षा भोगले यांचं वक्तव्य देखील आहे. जे नेहमी ते द्रविडसाठी वापरायचे. 'जगात नेहमी एक राहुल द्रविड होता आणि राहिल.'



भारतासाठी त्याने टेस्ट आणि वनडे फॉरमॅटमध्ये १० हजाराहून अधिक रन केले आहेत. द्रविड हा महान खेळाडू आहे. तो नेहमी भारतासाठी एक भींत म्हणून उभा राहिला. द्रविड हा बंगळुरुमधील नॅशनल क्रिकेट अॅकेडमीचा प्रमुख देखील आहे. 


क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर ही तो आज अनेक खेळाडू घडवत आहे. कुलदीप यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर सारखे खेळाडू त्याच्याकडूनच शिकले आणि पुढे आले आहेत.