मुंबई : राजस्थानचा विकेटकीपर दिशांत याग्निकने सामना सुरु असताना क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केलाय. याग्निकने रणजी ट्रॉफी २०१७-१८ मध्ये झारखंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान हा निर्णय जाहीर केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिशांतने या सामन्यातील पहिल्या डावात ३४ धावा केलल्या. ३४ वर्षीय या क्रिकेटरने प्रथम श्रेणी क्रिकेटचे २५, सूची एमधील २५ आणि २२ टी-२० सामने खेळलेत. राजस्थानच्या बासवाडामध्ये राहणाऱ्या दिशांतने २००२-०३मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 


निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर दिशांत म्हणाला, हा निर्णय घेणे माझ्यासाठी गरजेचे होते. मला पुढे खेळण्यासाठी प्रेरणा मिळत नव्हती. वयाच्या ३४ व्या वर्षी तुम्ही स्वत:ला मैदानात खेळण्यासाठी प्रवृत्त करु शकत नाही. त्यामुळे ज्युनियर्सना संधी देऊ असा विचार मी केला. जम्मू-काश्मीरविरुद्ध खेळतानाच निवृत्ती घेण्याचा विचार आला होता. याबाबत मी निवड समितीशी बोललो आणि हा माझा शेवटचा सामना असू शकतो. 


विकेटकीपर दिशांत २०११ ते २०१५ दरम्यान आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स संघाचाही भाग होते. मात्र आयपीएलमध्ये त्याला अनेक सामन्यांमध्ये बाहेरत बसावे लागले होते.