मुंबई : आयपीएलमधील खेळाडूंच्या कामगिरी बरोबरचं त्यांच्या बायकांचीही चर्चा खूप रंगते.  सध्या शिमरॉन हेटमायर या राजस्थान संघातील खेळाडूच्या पत्नीची चर्चा सोशल मीडियावर रंगलीय. हेटमायरची पत्नी सुंदर दिसण्यात एखाद्या मॉडेललाही मागे सोडेल, इतकी छान ती दिसते. दरम्यान दोघांची लव्हस्टोरीही खूप रंजक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा वेस्ट इंडिजचा शिमरॉन हेटमायर नुकताच बाप बनलाय. पत्नीच्या प्रसूतीची तारीख जवळ आल्याने त्याने काही आयपीएल सामन्यांमधून ब्रेक घेतलाय. बायो बबल सोडून तो आपल्या मायदेशी परतलाय. वडील झाल्यानंतर त्याने मुलासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 



मीडिया रिपोर्टनूसार, शिमरॉन हेटमायरला पत्नी निर्वाणी हेटमायरला प्रपोज करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले होते. दोघांच्या प्रेमाची सुरुवात फेसबुकवरून झाली होती. शिमरॉनने निर्वाणीला मेसेज केला होता पण त्याला तिने उत्तर दिले नव्हते. पण हेटमायरने धीर सोडला नाही आणि तो प्रयत्न करत राहिला, आणि अखेर दोघे रिलेशनमध्ये आले. 



एका मुलाखतीत शिमरॉनने सांगितले की, मी तिला मेसेज करायचो पण तिने अजिबात मला रिप्लाय दिला नाही. मात्र, काही महिन्यांनंतर तिने मला रिप्लाय द्यायाला सुरूवात केली. तसेच हेटमायर तिच्या डोळ्यांवर फिदा होता. शिमरॉनने 2019 मध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर निर्वाणीला लग्नासाठी प्रपोज केले होते. निर्वाणीनेही यासाठी होकारही दिला. दोघांनी मग सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती चाहत्यांना दिली होती.



आयपीएलमध्ये शिमरॉन हेटमायरची कामगिरी उत्कृष्ट राहिलीय. अनेक सामन्यांमध्ये त्याने टीमला स्वत:च्या बळावर संघाला विजय मिळवून दिलाय.  



यंदाच्या आयपीएलमध्ये हेटमायरने 11 सामने खेळले आहेत.  यात 72.75 च्या सरासरीने आणि 166.29 च्या स्ट्राइक रेटने 291 धावा ठोकल्या आहेत. या मोसमात त्याने आतापर्यंत 18 चौकार आणि 21 षटकारही मारलेत.