Raksha Bandhan 2021 : भारतीय क्रिकेटपटूंच्या स्टार बहिणी तुम्ही पाहिलात का? पाहा फोटो
रक्षाबंधनाच्या दिवशी टीम इंडियाचे बहुतेक खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर आहेत, तर काही खेळाडू आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी यूएईला पोहोचले आहेत.
मुंबई : रक्षाबंधनाच्या दिवशी टीम इंडियाचे बहुतेक खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर आहेत, तर काही खेळाडू आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी यूएईला पोहोचले आहेत. त्यामुळे या खेळाडूंना त्यांच्या बहिणी सोबत रक्षाबंधन साजरा करता येणार नाहीय. या वर्षीच काय, तर दर वर्षी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे क्रिकेटर्सना त्यांच्या बहिणीकडून राखी बांधून घेता येत नाही. परंतु त्यांचे त्यांच्या बहिणींवरचे प्रेम मात्र कधाही कमी होत नाही.
आपल्या भारतीय क्रिकेटर्स तर माहित आहेत परंतु त्यांच्या लाडक्या बहिणी नक्की दिसतात तरी कशा? हे माहित नाही. त्यामुळे आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासमोर काही फोटो घेऊन आलो आहोत.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने या स्टार बहिणींशी तुमची ओळख करून घेऊया.
अजिंक्य रहाणे
भारतीय कसोटी संघाच्या उपकर्णधाराचे बालपण अनेक अडचणींमधून गेले. आज तो यशस्वी आहे, तर त्याच्या मागे त्याची बहीण अपूर्वाचे योगदान आहे. रहाणेचा असा विश्वास आहे की, आपल्या बहिणीचे प्रेम आणि पाठिंबा ही जगातील सर्वोत्तम भेट आहे.
जसप्रीत बुमराह
टीम इंडियाचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराह अनेकदा क्रिकेट दौऱ्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी घरी नव्हता, त्यामुळेच बऱ्याच वेळा तो रक्षाबंधनाच्या दिवशी आपली बहीण जुहिका बुमराहला राखी बांधू शकला नाही, पण त्याचे त्याचा बहिणीवर आजही तितकेच प्रेम आहे.
विराट कोहली
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला त्याच्या बहिणीची ओढ जास्त आहे. त्याची मोठी बहीण भावना हिला तिच्या भावाला म्हणजेच विराटला दरवर्षी राखी बांधण्याची इच्छा आहे, पण क्रिकेटमुळे कित्येक वर्ष हे शक्य नाही. ती आपल्या क्रिकेटपटू भावाला प्रेमाने 'चिकू' म्हणते.
एमएस धोनी
टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार धोनीचे त्याच्या बहिणीवर खूप प्रेम आहे. त्याच्या मोठ्या बहिणी जयंतीने धोनीच्या कारकिर्दीत त्याला खूप पाठिंबा दिला होता. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ती अनेक वेळा स्टेडियममध्ये माहीला सपोर्ट करताना दिसली.
सुरेश रैना
भारतीय फलंदाज सुरेश रैनाला त्याची मोठी आणि एकुलती एक बहीण रेणूबद्दल खूप आदर आहे. इतरांप्रमाणे त्यालाही आपल्या लाडक्या बहिणीकडून राखी बांधुन घेणे आवडते.
वीरेंद्र सेहवाग
वीरेंद्र सेहवाग हा त्याच्या पालकांचा तिसरं अपत्य आहे, त्याला 2 मोठ्या बहिणी आहेत, त्यांची नावे मंजू आणि अंजू आहेत. त्याने एकदा त्याच्या बहिणींबद्दल सांगितले होते, 'माझ्या प्रार्थनेत परमेश्वराचा खूप प्रभाव पडो, सर्व बहिणींचे घर नेहमीच फुलांनी भरलेले राहो.'
सचिन तेंडुलकर
क्रिकेटच्या मास्टर ब्लास्टरला एक बहीण आहे, तिचे नाव सविता आहे. सचिन आणि सविता यांचे नाते खूप खोल आहे. सचिनच्या मते, भाऊ-बहिणीचे नाते असे आहे की ते कालांतराने सखोल होत जाते.