वडोदरा : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये झालेल्या पाकिस्तान विरोधातील भारताच्या पराभवाच्या चौकशीची मागणी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं की, ''भारताने मागच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता. असं असतांना मजबूत अशी भारतीय टीम कशी पाकिस्तानशी १८० रन्सने हारली. असा सवाल करत त्यांनी याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.


पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा 180 धावांनी पराभव करत पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान प्रथम फलंदाजी करत 4 विकेट गमवत 338 धावा केल्या होत्या. तुलनेत भारत फक्त 180 धावा करु शकला. यावर रामदास आठवले यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.