रणजी करंडकमध्ये विदर्भाच्या टीमचा ऐतिहासिक विजय
रणजी क्रिकेटच्या फायनल मॅचमध्ये विदर्भाच्या टीमने विजय मिळवत इतिहास घडवला आहे.
इंदूर : रणजी क्रिकेटच्या फायनल मॅचमध्ये विदर्भाच्या टीमने विजय मिळवत इतिहास घडवला आहे.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
रणजी मॅचमध्ये विदर्भाच्या टीमने दिल्लीचा पराभव करत विजय मिळवला आहे. विदर्भाच्या टीमने दिल्लीच्या टीमचा ९ विकेट्स राखून धुव्वा उडवला आहे.
या विजयासोबतच विदर्भाच्या टीमने पहिले रणजी विजेतेपद आपल्या नावावर केलं आहे.
विदर्भाच्या टीमने अष्टपैलु कामगिरी दाखवल्यामुळे हा इतिहास घडला आहे.
विदर्भाच्या टीमकडून पहिल्या इनिंगमध्ये अक्षय वाडकरने १३३ रन्सची धडाकेबाज इनिंग खेळली. त्यामुळे विदर्भाच्या टीमला मॅचवर आपली मजबूत पकड निर्माण करता आली.
विदर्भचा फास्ट बॉलर रजनीश गुरबानी याने रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या इनिंगमध्ये सहा विकेट्स घेतले. तर, दुसऱ्या इनिंगमध्ये २ विकेट्स घेतले. अशा प्रकारे रजनीश गुरबानी याने या मॅचमध्ये एकूण आठ विकेट्स घेतले आहेत.
रणजी करंडकमध्ये विदर्भाच्या टीमने रचला इतिहास