Ranji Trophy : कडेकोट सुरक्षा भेदून कोहलीला भेटण्यासाठी मैदानात पोहोचला फॅन, विराटला पाहून जे केलं.... Video Viral

Virat Kohli Ranji Trophy 2025 : विराट कोहलीला खेळताना पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक आणि कोहलीचे चाहते स्टेडियमवर पोहोचले आहेत.
Ranji Trophy 2025 : तब्बल 13 वर्षांनी भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली रणजी ट्रॉफीचे (Ranji Trophy) सामने खेळत आहे. गुरुवार 30 जानेवारी रोजी अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली विरुद्ध रेल्वे यांच्यातील रणजी सामन्याला सुरुवात झालीये. विराट कोहलीला (Virat Kohli) खेळताना पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक आणि कोहलीचे चाहते स्टेडियमवर पोहोचले आहेत. त्यामुळे सुरक्षेसाठी स्टेडियमवर कडेकोट बंदोबस्त करण्यात आलाय. असं असताना देखील कोहलीचा एक जबरा फॅन त्याला भेटण्यासाठी सुरक्षा भेदून मैदानात पोहोचला. विराट जवळ पोहोचलेल्या फॅनला पाहून सर्वचजण आश्चर्यचकित झाले.
मैदानात नेमकं काय घडलं?
अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली विरुद्ध रेल्वे यांच्यातील रणजी ट्रॉफी सामन्याचा टॉस दिल्लीचा कर्णधार आयुष बडोनीने जिंकला आणि त्याने प्रथम गोलंदाजी निवडून रेल्वे संघाला फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. दरम्यान प्रेक्षकांमधील एक व्यक्ती मैदानात आला आणि विराट कोहली उभा असलेल्या दिशेने धावू लागला. या व्यक्तीला पाहून मैदानावरील फिल्डर्स त्यांच्या जागीच थांबले आणि नेमकं काय सुरु आहे हे पाहू लागले. मैदानातील फलंदाज सुद्धा त्या व्यक्तीकडे पाहू लागला. यामुळे खेळ काहीवेळ थांबवावा लागला. मैदानात धावणारा तो व्यक्ती थेट विराटजवळ पोहोचला आणि त्याच्या पायावर नतमस्तक झाला. तेवढ्यात सुरक्षारक्षक तिथे पोहोचले आणि त्यांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. हे पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले.
पाहा व्हिडिओ :
विराटचं रणजी ट्रॉफी करिअर :
विराटने शेवटचा सामना 2012 मध्ये गाजियाबाद उत्तर प्रदेशच्या संघाविरुद्ध खेळला होता. विराट अनेक वर्षांनी देशांतर्गत क्रिकेट सामना खेळणार असल्याने त्याचे चाहते विराटची फलंदाजी पाहण्यासाठी उत्सुक आहेत. विराट कोहलीने आतापर्यंत रणजी ट्रॉफीमध्ये एकूण 23 सामने खेळले असून या सामन्यांमध्ये 50.77 च्या सरासरीने 1574 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 5 शतक देखील लगावली आहेत.
हेही वाचा : वीरेंद्र सेहवाग आणि पत्नीमध्ये गाडीत कडाक्याचं भांडण, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान Video व्हायरल
सामना कुठे पाहता येणार Live?
अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली विरुद्ध रेल्वे यांच्यात रणजी ट्रॉफीचा सामना खेळवला जाईल. गुरुवार 30 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट स्पोर्ट्स 18 नेटवर्क च्या चॅनेलवर दाखवलं जाईल. तसेच प्रेक्षक जिओ सिनेमा अँप तसेच वेबसाईटवर हा सामना फ्रीमध्ये लाईव्ह पाहू शकता.