इंदूर : रणजी क्रिकेटच्या फायनल मॅचमध्ये विदर्भाच्या टीमने विजय मिळवत इतिहास घडवला आहे. वासिम जाफरने जोरदार फटकेबाजी करताना शेवटच्या षटकात ४ चौकार ठोकत विदर्भ संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्याच्या चांगल्या खेळीमुळे त्याचे कौतुक होत आहे. विदर्भाने दीर्घ प्रतिक्षेनंतर रणजी करंडकावर नाव कोरलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विदर्भाने पहिल्या डावात ५४७ धावा केल्या तर दिल्लीने पहिल्या डावात २९५ धावा आणि दुसऱ्या डावात २८० धावा केल्यात. विजयासाठी केवळ २९ धावांची गरज असताना विदर्भाने १ बाद ३२ धावा केल्यात. विदर्भाने दिल्लीवर ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवलाय. वासिम जाफरने ४ चौकार ठोकत १७ चेंडूत नाबाद १७ धावा केल्या. आर आर संजयने नाबाद ९ धावा केल्यात.



विदर्भाच्या संघाची अष्टपैलू कामगिरीने हा विजय सोपा झाला. दिल्ली संघाला २८० धावांवर रोखल्यानंतर अखेरच्या डावात केवळ २९ धावांची विजयाची गरज विदर्भ संघाला होती. विदर्भाने दिल्लीवर ९ गडी राखून सहज मात केली. जाफरने अखेरच्या षटका ४ चौकारची लयलूट करत विदर्भाचा ऐतिहासिक विजय मिळवून दिला.


रणजी मॅचमध्ये विदर्भाच्या टीमने दिल्लीचा पराभव करत विजय मिळवला आहे. या विजयासोबतच विदर्भाच्या टीमने पहिले रणजी विजेतेपद आपल्या नावावर केलं आहे. रजनीष गुरबानीचे सामन्यात ८ विकेट घेतल्या तर वाखरे ५ मोहरे टीपले. या विजयात वासिम जाफरचा मोलाचा वाटा आहे.