Rashid Khan On Afghanistan's Earthquake : सध्या भारतात खेळवण्यात येत असलेल्या वर्ल्ड कप (ICC ODI World Cup 2023) सामन्यांना धमाकेदार अंदाजात सुरूवात झाली आहे. वर्ल्ड कपच्या तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला पराभवाचं तोंड पहावं लागलं होतं. बांगलादेशने अफगाणिस्तानला धुळ चारली होती. त्यानंतर आता अफगाणिस्तानचा सामना येत्या 11 तारखेला भारताशी (IND vs AFG) होणार आहे. अशातच भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज राशिद खान (Rashid Khan) याने मोठी घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भूकंपाच्या भीषण धक्क्याने अफगाणिस्तान (Afghanistan Earthquake) हादरलं आहे. अफगानिस्तानच्या पश्चिम भागात झालेल्या शक्तिशाली भूकंपात जवळपास 2000 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर 10,000 हून अधिक लोक जखमी असल्याची माहिती तालिबानी सरकारकडून देण्यात आली आहे. अशातच आता राशिद खानने आपली वर्ल्ड कपची मॅच फी (Rashid Khan Donate Match Fees) भूकंपग्रस्तांना देणार असल्याचं जाहीर केलं आहे.


काय म्हणाला Rashid Khan ?


अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील प्रांतांवर (हेरत, फराह आणि बादघिस) झालेल्या भूकंपाच्या दुःखद परिणामांबद्दल मला अत्यंत दुःखानं कळलं. प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी मी माझे सर्व वर्ल्ड कप सामन्यांची फी दान करत आहे. लवकरच, आम्ही गरजू लोकांना मदत करू शकणार्‍यांना आवाहन करण्यासाठी निधी उभारणी मोहीम सुरू करणार आहोत, असं राशिद खान याने म्हटलं आहे.



दरम्यान, राशिद खान अफगाणिस्तानचा सध्याच्या सर्वात मोठा चेहरा मानला जातो. तालिबानने ज्यावेळी अफगाणिस्तान ताब्यात घेतलं तेव्हा देखील राशिद खानने विविध लोकांना मदत केली होती. तसेच अनेक संकटात तो अफगाणी लोकांच्या मदतीला धावून येतो. अशातच आता भूकंपग्रस्तांसाठी देखील त्याने मदत पाठवली आहे.